HOME LOAN FREE | ही एक छोटीशी दुरुस्ती, तुम्हाला संपूर्ण होमलोनचा हफ्ता माफ करु शकते

| Updated on: Apr 28, 2023 | 10:15 AM

HOME LOAN FREE | ही छोटीशी दुरुस्ती तुम्हाला कामाला येईल. कर्जाचे ओझे, प्रेशर, दगदग छुमंतर होईल. पण त्यासाठी हा उपाय करावा लागेल, तर तुमचा होमलोनचा हफ्ता पण माफ होऊ शकतो.

HOME LOAN FREE | ही एक छोटीशी दुरुस्ती, तुम्हाला संपूर्ण होमलोनचा हफ्ता माफ करु शकते
असे व्हा कर्जमुक्त
Follow us on

नवी दिल्ली : स्वतःचा टुमदार वास्तू असावी, चंद्रमौळी का असेना एक छोटंस घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न आहे. पण सध्या हे स्वप्न कर्जाचा (Home Loan) टेकू लावल्याशिवाय काही पूर्ण करता येत नाही. गृहकर्जाचे व्याजदर आता वाढले आहेत. त्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ करण्याचा सपाटा लावल्याने अनेकांच्या ईएमआयमध्ये मोठी वाढ झाली तर काहींचा कर्जाचा कालावधी वाढला. पण एक छोटीशी दुरुस्ती तुम्हाला कामाला येईल. कर्जाचे ओझे, प्रेशर, दगदग छुमंतर होईल. पण त्यासाठी हा उपाय करावा लागेल, तर तुमचा होमलोनचा हफ्ता पण माफ होऊ शकतो. काय आहे हा उपाय, जो केल्यावर घरावरचं व्याज माफ (Home Loan Free) होऊ शकतं?

व्याजाचा डोंगर
गृहकर्जावर खूप व्याज भरावे लागते. परिणामी अनेकजण घर घेण्यास टाळाटाळ करतात. समजा तुम्ही 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यावर 9 टक्के व्याज दराने 20 वर्षांच्या मुदतीत 35 लाख रुपयांचे व्याज फेडावे लागते. इतकी रक्कम व्याजात जाते. गृहकर्जावर व्याज भरण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला एक युक्ती कामी येऊ शकते.

म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक
व्याजातून मुक्तीसाठी म्युच्युअल फंड हा चांगला उपाय आहे. घर खरेदीवेळीच काही जण योग्य म्युच्युअल फंड निवडतात आणि त्यात SIP द्वारे गुंतवणूक करतात. त्यामुळे एकाचवेळी खर्च आणि गुंतवणुकीचा कुठलाही ताण येत नाही. समजा तुम्ही 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे आणि 20 वर्षांसाठी त्यावर व्याजदर लक्षात घेता, तुम्हाला बँकेला 1 कोटी रुपये चुकवावे लागतील. हा खर्च काढण्यासाठी तुम्हाला एसआयपीत गुंतवणूक करावी लागेल.

हे सुद्धा वाचा

50.37 लाखांचे व्याज
समजा तुम्ही 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे आणि 20 वर्षांसाठी त्यावर व्याजदर लक्षात घेता, तुम्हाला बँकेला 1 कोटी रुपये चुकवावे लागतील. हा खर्च काढण्यासाठी तुम्हाला एसआयपीत गुंतवणूक करावी लागेल. 50 लाख रुपयांवर 8 टक्के वार्षिक व्याज दराने तुम्ही कर्ज घेतले आहे. तुमचा मासिक हप्ता 41,822 रुपये होईल. 20 वर्षांसाठी तुम्ही एकूण 50.37 लाख रुपये व्याज चुकते केले. घराची किंमत 50 लाख रुपये आणि त्यावर व्याजाची रक्कम 50.37 लाख रुपये आहे.

अशी होईल कर्जमुक्ती
म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. घर खरेदीवेळीच काही जण योग्य म्युच्युअल फंड निवडतात आणि त्यात SIP द्वारे गुंतवणूक करतात. त्यामुळे एकाचवेळी खर्च आणि गुंतवणुकीचा कुठलाही ताण येत नाही. घरासाठी तुम्हाला एकूण 1 कोटी 37 हजार रुपये खर्च द्यावा लागणार आहे. आता म्युच्युअल फंडात जर तुम्ही मासिक हप्त्याच्या 25% टक्के गुंतवणूक कराल. म्हणजे 10,912 रुपयांची एसआयपी सुरु कराल.तर फायदा होईल. 10,912 रुपयांच्या एसआयपीवर तुम्हाला वार्षिक केवळ 12 टक्के परतावा गृहित धरुयात. यापेक्षा अधिकच परतावा मिळेल. पण 12 टक्के परतावा गृहित धरला तर, 20 वर्षानंतर तुमच्याकडे 1.1 कोटी रुपये असतील.

कर्ज पूर्व-भरणा केल्याचा फायदा
30 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी घेतल्यास पूर्व भरणा रक्कम जमा करण्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. समजा 9 टक्के व्याज दराने घेतलेल्या कर्जावर तुम्हाला 27,476 रुपये हप्ता भरावा लागेल. या गृहकर्जावर मासिक 4 हजार रुपायांचा पूर्व भरणा केल्यास व्याजदरातील 2.5 टक्के वाढीचा परिणाम जाणवणार नाही. तुमची व्याजापोटी जास्त जाणारी रक्कम कमी होईल.

11 लाखांची लॉटरी
30 लाखांवर तुम्हाला 34.78 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. एकूण 64.78 लाख रुपये द्यावे लागतील. पण कर्ज पूर्व भरणा रक्कमेमुळे तुम्हाला मुळ रक्केमसह व्याजापोटी केवळ 53.68 लाख द्यावे लागतील. कर्ज पूर्व रक्कम भरल्याने तुमचे 11.10 लाख रुपये वाचतील.