Petrol Diesel Price Today | भावांनो, महागाई भडकण्यास सर्वात कारणीभूत मानण्यात येते ते पेट्रोल-डिझेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती पुन्ही भडकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) ब्रेंट क्रूड आईलच्या (Brent Crude Oil)किंमतींनी 100 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता गेल्या तीन महिन्यांपासून इंधन दरवाढीच्या आघाडीवर असलेली शांतता विचलीत होऊ शकते. तेल कंपन्या अगोदरच तोट्याची दवंड पिटवीत दबाव तयार करत आहेत. त्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत असल्याची ओरड होत आहे. परंतु, सरकारच्या धोरणांपुढे कंपन्यांची बोलती बंद आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती भडकल्याने कंपन्यांना आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे अजून किती दिवस कंपन्या दर स्थिर ठेवणार हे समोर येईल. मात्र आज बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) वाढ झालेली नाही. तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलवर तोटा सहन करावा लागत आहे. जून तिमाहीत IOC, HPCL आणि BPCL चा एकत्रित तोटा सुमारे 18,480 कोटी रुपये आहे.
गुडरिटर्न्स या संकेतस्थळावर आज मंगळवारचे इंधन दर दिले आहेत. त्यानुसार, मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 106.31 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.27 रुपये आहे. पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 105.99 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.51 रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.31 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 93.28 रुपये आहे. ठाण्यात पेट्रोल प्रति लिटर 106.38 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.34 रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.22 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.73 रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर 107.70 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.16 रुपये आहे. अकोल्यात पेट्रोल प्रति लिटर 106.24 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.79 रुपये आहे. नागपूर शहरात पेट्रोल प्रति लिटर 106.03 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.58 रुपये आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतात.
तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि तुमचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPrice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवल्यानंतर त्यांना ताजे दर एसएमएसद्वारे मिळतील.