मुंबई – दोन दिवस पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात वाढ झाली. पण आज गुरूवारी मात्र सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर तब्बल 137 दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. मागच्या आठवड्यात नामांकित दूध कंपन्यांनी दूधांच्या दरात वाढ केली. तसेच घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात सुध्दा 50 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची झळ सहन करावी लागत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरवाढीनुसार दिल्लीत आज पेट्रोलचा दर 97.01 रूपये आहे. तर डीझेलचा दर 88.27 आहे. मुंबईत देखील पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने सध्याचा दर 111.67 रूपये आहे. तर तर डिझेल 95.85 रूपये आहे.
महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरात पेट्रोल डिझेलचा दर किती ?
शहर पेट्रोल डिझेल
कोल्हापूर 111.33 94.14
पुणे 112.14 94.89
अहमदनगर 111.75 94.51
औरंगाबाद 113.32 97.50
चंद्रपूर 111.47 94.29
गडचिरोली 112.91 95.66
नागपूर 111.39 94.19
नाशिक 112.15 94.90
रायगड 111.51 94.26
सोलापूर 111.88 94.66
ठाणे 111.81 95.99
पेट्रोल डिझेलच्या दर वाढीची माहिती गोल्ड ई टर्न या संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.
पीएनजीची किंमत प्रति 1 रूपयाने वाढवली
एलपीजीच्या किमती वाढल्यानंतर आता सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशांतर्गत पीएनजीची किंमत प्रति 1 रूपयाने वाढवली आहे. मात्र, वाढलेल्या किमती संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या नाहीत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये लागू होणार आहेत. याशिवाय राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्ली आणि गौतम बुद्ध नगरमध्ये 24 मार्चपासून घरगुती पीएनजीच्या किमतीत 1 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पीएनजीच्या किमती वाढल्यानंतर आता दिल्लीत पीएनजी गॅस 36.61 रुपयांवरून 37.61 रुपये प्रति एससीएम झाला आहे.
एक मेसेज करा आणि तपास तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा दर
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एका मेसेजच्या आधारे दररोज कळू शकतो. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.