Unemployment : तरुणांना 6,000 रुपयांचा बेरोजगारी भत्ता ! केंद्र सरकारने काय दिली माहिती.. तुम्हाला मॅसेज आला का?

| Updated on: Oct 29, 2022 | 6:17 PM

Unemployment : तरुणांना 6,000 रुपयांचा बेरोजगारी भत्ता मिळणार असा मॅसेज तुम्हालाही आलाय का?

Unemployment : तरुणांना 6,000 रुपयांचा बेरोजगारी भत्ता ! केंद्र सरकारने काय दिली माहिती.. तुम्हाला मॅसेज आला का?
बेरोजगारी भत्त्यावरच प्रश्न
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारमार्फत (Central Government) नागरिकांसाठी अनेक योजना (Welfare Scheme) राबविण्यात येतात. तरुणांसाठी, महिलांसाठी, विधवांसाठी, वृद्धांसाठी विविध योजना सुरु आहेत. या योजनांमध्ये आता रक्कम (Amount) थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.

पण योजनेच्या नावाखाली अनेक वेळा फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. तेव्हा असाच एक मॅसेज सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यामध्ये पुन्हा तरुणांना जाळ्यात ओढून फसविण्याचा डाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुशिक्षित बेरोजगारांना सायबर भामट्यांनी टार्गेट केले आहे. सध्या याविषयीचा एक मॅसेज व्हाट्सअपसह इतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याआधारे तरुणांची फसवणूक करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

WhatsApp वरील मॅसेजमध्ये ‘प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना’ अशा नावाखाली ही फसवणूक सुरु आहे. या मॅसेजमध्ये तरुणांना केंद्र सरकार दर महिन्याला 6,000 रुपयांचा भत्ता देणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

असा मॅसेज तुम्हाला आला असेल तर सावध व्हा. कारण केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केलेली नाही. तुम्ही त्यासाठी कोणतीही माहिती या मॅसेजवरील लिंकमध्ये देऊ नका, केंद्र सरकारनेच याविषयी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

WhatsApp वरील मॅसेजनुसार मोदी सरकार प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेतून बेरोजगारांना दर महिन्याला 6,000 रुपयांची मदत करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. रजिस्ट्रेशनसाठी एक लिंकही या मॅसेजद्वारे देण्यात आली आहे.

PIB ने या मॅसेजची पडताळणी केली आहे. हा मॅसेज खोटा असल्याचे समोर आले असून केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केलेली नाही. पीआयबीने अशा मॅसेजकडे दुर्लक्ष करण्याचे आणि तो फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे.

तुम्हाला ही संशयास्पद मॅसेज आला असेल तर तुम्ही यासंबंधीची पडताळणी करु शकता. त्यासाठी PIB च्या फेसबूक पेजला https://factcheck.pib.gov.in/ भेट द्यावी लागेल.

याशिवाय तुम्हाला PIB च्या 918799711259 या व्हॉट्सअप क्रमांकावर आणि pibfactcheck@gmail.com या ई-मेल आयडीवर पुढील माहिती मिळू शकते.