स्वस्तात घर घेण्याच्या विचारात असाल तर थांबा, कारण पंजाब नॅशनल बँकेने नुकतीच एका खास ऑफरची घोषणा केली आहे. ज्या माध्यमातून तुम्हाला बाजार भावाच्या कमी किंमतीमध्ये घरे, दुकाने तसेच इतर मालमत्ता खरेदी करून आपल्या पैशांची बचत करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) जाहीर केलेल्या ई-लिलावाअंतर्गत (e-auction) घर, दुकान आणि जमीन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी हा मेगा ई-लिलाव होणार आहे. येत्या आठवडाभरात 2490 निवासी, 607 व्यावसायिक आणि 255 औद्योगिक मालमत्तांचा (property) लिलाव या माध्यमातून करण्यात येणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
सर्वप्रथम यादी तपासा
या लिलावात बाजारभावापेक्षा कमी बोली लावून मालमत्ता खरेदी करता येणार आहे. ई-लिलावाअंतर्गत, घरापासून ते दुकानांपर्यंत अनेक प्रकारच्या मालमत्ता थेट बँकेतून योग्य किंमतीत खरेदी करता येईल. लिलावात सहभागी होण्याआधी, मालमत्तांची यादी तपासणे फार महत्त्वाचे आहे कारण या मालमत्ता वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत.
पारदर्शक पद्धतीने ई-लिलाव
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की पीएनबी 15 फेब्रुवारी 2022 रोजी देशभरातील निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा ऑनलाइन मेगा ई-लिलाव आयोजित करत आहे. ‘PNB SARFAESI’ कायद्यांतर्गत पारदर्शक पद्धतीने ई-लिलाव आयोजित करत आहे. भारतीय बँकस् असोसिएशन (IBA)चा इंडियन बँक्स् ऑक्शन प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन (IBAPI) पोर्टल हा एक उपक्रम आहे, जो अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) धोरणांतर्गत बँकेद्वारे लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे एक व्यासपीठ आहे.’
‘या’ मालमत्तांचा होणार लिलाव
बँक त्या मालमत्तांचा लिलाव करतात, ज्या लोकांनी बँकेकडून दीर्घकाळ कर्ज घेतले आहे, परंतु काही कारणास्तव एकतर ते लोक कर्जाची परतफेड करू शकत नाहीत किंवा कर्जाची परतफेड करण्यास जाणूनबुजून चालढकल करतात. अशा लोकांच्या जमिनी किंवा भूखंड बँकेने ताब्यात घेतले आहेत. काही काळानंतर, बँक अशा मालमत्तेचा लिलाव करते आणि लिलाव केलेल्या मालमत्तेतून त्याचे पैसे वसूल करते.
‘अशी’ करा नोंदणी
लिलावात सहभागी होण्यासाठी, प्रथम eBKray पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. पुढे, ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’वर क्लिक करा आणि फोन नंबर, ई-मेल पत्ता आणि आयडी टाका. यानंतर, तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करून ‘केवायसी’ करून घ्या. त्यानंतर, बोलीदाराने ‘ईएमडी’ची रक्कम ‘ग्लोबल ईएमडी वॉलेट’मध्ये ट्रान्सफर करावी. त्यानंतर तुमचे चलन ‘ई-ऑक्शन प्लॅटफॉर्म’वर अपलोड करावे लागेल. यानंतर तुम्ही ‘ई-ऑक्शन प्लॅटफॉर्म’वर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पध्दतीने लिलावात सहभाग घेऊन तुमची बोली लावू शकता.
आणखी वाचा :