नवी दिल्ली : पोस्ट ऑफिस (Post Office) खात्याने तुमच्यासाठी कमाईची संधी (Income Opportunity) उपलब्ध करुन दिली आहे. पोस्ट खात्याच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवयाच्या आणि त्यामाध्यमातून कमाई करायची अशी ही योजना आहे. त्यासाठी केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक (Investment) करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कमाई करता येणार आहे .
पोस्ट खात्यातील विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास आजही भारतीय पसंती देतात. त्यामुळे याच माध्यमातून तुम्हालाही कमाईची संधी मिळणार आहे. पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी (Post Office Franchise) घेऊन तुम्हाला व्यवसाय करता येईल.
या व्यवसायासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक करुन तुम्हाला योजनेत सहभागी होता येईल. या व्यवसायातून विविध योजना ग्राहकांपर्यंत पोहचविताय येईल.
इंडिया पोस्टचे अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात पोस्ट कार्यालयांचा विस्तार होणार आहे. देशात 10 हजार नवीन पोस्ट कार्यालये सुरु करण्याची योजना आहे.
प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर पोस्ट खात्याच्या मार्फत बँकिंग सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेत तुम्ही सहभागी होऊ शकतात. तुम्ही पोस्ट खात्याची फ्रेंचायझी घेऊन त्यामाध्यमातून कमाई करु शकता.
फ्रेंचायझी घेऊन पोस्ट खात्याच्या अनेक योजना आणि बँकिंग सेवा तुम्ही लोकांपर्यंत पोहचवू शकता. प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात या सेवा पुरविण्यासाठी पोस्ट खात्याकडून फ्रेंचायझी देण्यात येणार आहे.
या योजनेतंर्गत घर बसल्या पोस्ट कार्यालय सुरु करता येऊ शकते. त्यामाध्यमातून चांगली कमाई करता येऊ शकते. हे व्यावसायिक मॉडेल म्हणून तुम्हाला चांगली कमाई करुन देईल. तुम्ही दर्शनी जागेत, मोक्याच्या ठिकाणी पोस्ट कार्यालयाच्या सेवा देऊ शकता. त्यासाठी केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
या फ्रँचायझीसाठी तुम्हाला पोस्ट खात्याकडे अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर पुढील 15 दिवसांत पुढील कार्यवाही होईल. कमीशन आधारावर तुम्हाला या योजनेतून कमाई करता येईल.
इयत्ता 8वीं उत्तीर्ण, वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांना या योजनेत सहभागी होता येईल. तुम्हाला संगणकीय ज्ञान असणे ही आवश्यक आहे. यासर्व आधारावर तुम्हाला कमाई करता येईल.