पैशाची बचत केल्याने आपले भविष्य सुरक्षित होते. त्यामुळे आपण चांगले व्याज दर मिळणाऱ्या योजनांचा सतत शोध घेत असतो. आता कमी कष्टात सहजपणे महिन्याला पैसे कमावू शकतो.तुम्ही पोस्ट ऑफीसच्या स्मॉल सेव्हींग स्कीम मंथली इन्कम स्कीम ( POMIS) द्वारे पैसे कमावू शकता. आकर्षक व्याज दर मिळत असल्याने तसेच पोस्ट ऑफीसच्या मंथली इन्कम स्कीम एक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय असल्याने हा नियमित गुंतवणूकीचा मार्ग बनू शकतो.
पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यांवर सध्या 7.4 टक्के वार्षिक व्याजदर मिळत आहे. यात सिंगल खात्याच्या मार्फत 9 लाख रुपये आणि जॉइंट खात्याच्या मार्फत कमाल 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पोस्ट ऑफीस मंथली इन्कम अकाऊंट सरकारची मान्यता असलेली छोटी बचत योजना आहे. येथे गॅरंटीने रिर्टन मिळते. पोस्ट ऑफीसच्या योजनेत 100 टक्के सुरक्षेची गॅरंटी असतो. यात सिंगल खात्यासोबत जीवनसाथी सोबत जॉइंट खाते उघडण्याची देखील सोय आहे.
1. प्रौढ व्यक्तीच्या नावाने एकल खाते
2. संयुक्त खाते ( कमाल तीन प्रौढ ) ( जॉइंट ए किंवा जॉइंट बी )
3. अल्पवयीन मुलांच्या नावे पालक खाते उघडू शकतात
4. जर दहा वर्षांचे बालक असेल तर गुंतवणूक करा
1.यात खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपयांनी खाते उघडावे लागते. त्यानंतर 1000 रुपयांच्या प्रमाणात पैसे जमा करता येतात.
2. एकल खात्यात कमाल 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात कमाल 15 लाख रुपये जमा करता येतात.
3.संयुक्त खात्यात प्रत्येक खातेधारकाला गुंतवणकीचा बरोबर वाटा असतो.
या छोट्या बचत योजनेत 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या जमा केलेल्या पैशांवर वर्षाला व्याज मिळते. त्याला 12 हिश्श्यात वाटून दर महिन्याला आपल्या खात्यात ती रक्कम जमा होते.जर तुम्ही ही रक्कम दर महिन्याला काढली नाही तर तुमच्या पोस्ट ऑफीस बचत खात्यात राहील.या पैशा मुद्दल जोडून ते आपल्या पुढे व्याज मिळेल. या स्कीमच्या मॅच्युरिटी पाच वर्षांची आहे. परंतू पाच वर्षांने नव्या व्याजदराने ही योजना पुढे वाढवू शकतो.
व्याजदर – 7.4 दर साल
संयुक्त खात्यासाठी कमाल गुंतवणूक – 15 लाख रुपये
वार्षिक व्याज – 66,600 रुपये
मासिक व्याज – 5,550 रुपये