Post Office | पोस्ट खात्याच्या (Post Office) अनेक अल्पबचत योजना (Small Saving Scheme) आहे. त्यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. पोस्टाची आवर्ती ठेव योजना (Post office Recurring Deposit) अशी लोकप्रिय आहे. अल्पबचत योजना असली तरी सुरक्षितेतसह व्याजदर ही चांगला असल्याने जबरदस्त परतावा मिळतो.
पोस्टाच्या योजनेत तुम्ही अवघ्या 100 रुपयांपासून सुरुवात करु शकतात. या पट्टीत तुम्हाला गुंतवणूक करता येते. जेवढी जास्त गुंतवणूक कराल तेवढा परतावा जास्त मिळेल.
आवर्ती ठेव योजना ही पोस्टाची अल्पबचत योजना आहे. या योजनेत तुम्हाला 1,2 अथवा अधिक वर्षांसाठी रक्कम गुंतवता येते. मुदत ठेवीसारखी एकरक्कमी गुंतवणूक करण्याची गरज नसल्याने तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवू शकता. जमा रक्कमेवर तुम्हाला दर 3 महिन्याला व्याज देण्यात येते.
पोस्टाच्या या योजनेत सध्या 5.8 टक्के व्याज मिळते. हे व्याजदर एप्रिल 2020 पासून लागू आहेत. जेवढा गुंतवणुकीचा कालावधी जास्त तेवढा फायदा मिळतो.
सध्या अनेक बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केलेली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत पोस्टाच्या अल्पबचत योजनांचे व्याजदर ही वाढतील अशी आशा आहे.
आवर्ती ठेव योजनेत 18 वर्षांवरील कोणत्याही भारतीय नागरिकाला खाते उघडता येते. पालक त्यांच्या मुलांच्या नावेही खाते उघडू शकतात.
आवर्ती ठेव योजनेत तुम्हाला कर्जाची सुविधा पण मिळते. 12 महिने रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करता येतो. एकूण रक्कमेच्या 50 टक्के रक्कम कर्ज घेता येते.
दर महिन्याला 10 हजार रुपये जमा केल्यास आणि ही गुंतवणूक पुढील 10 वर्षे खंडीत न ठेवता सुरु ठेवल्यास तुम्हाला 16 लाख रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजेच एखाद्या म्युच्युअल फंडात जशी SIP द्वारे गुंतवणूक करता. तशीची दरमहिन्याला ही बचत करता येईल.