Post Office Saving Scheme | पोस्ट खात्याच्या अल्पबचत योजनेत (Post Office Saving Scheme) जबरदस्त परतावा मिळतो. विशेष म्हणजे यातील गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित असते. कारण सरकार या गुंतवणुकीची हमी घेते. तुम्ही बँकेत एफडी केली, बचत खात्यात रक्कम ठेवली आणि बँक (Bank)गोत्यात आली तर तुमची रक्कम बुडीत धन ठरते. कारण त्यावर फक्त 5 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. पण पोस्ट खात्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास सरकार या गुंतवणुकीची हमी (Guarantee) घेते. त्यामुळे पोस्टातील गुंतवणूक नेहमी तुमच्या फायद्याचीच ठरते. त्यामुळे कोट्यवधी भारतीय नागरीक गुंतवणुकीसाठी टपाल खात्याच्या योजनांना अग्रक्रम देतात. टपाल कार्यालय बचत योजना भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या (Ministry of Communications) अखत्यारीतील पोस्ट कार्यालयामार्फत दिली जाते. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि योजनेचा अर्ज भरुन दिल्यावर या योजनेत तुम्ही गुंतवणूक करु शकता.
पोस्ट ऑफिस बचत योजनेतंर्गत विविध पर्याय उपलब्ध आहेत. बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, मासिक योजना, बचत प्रमाणपत्रे इत्यादी. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार या पर्यायांमधून निवड करू शकतात. आता तर गुंतवणूकदारांना ऑनलाईनही अर्ज करता येतो.
पोस्ट ऑफिस बचत खाते रोखीनेच उघडता येते. ग्राहकांसाठी आता धनादेश आणि एटीएमची सुविधाही देण्यात येते. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरीत करता येते. बचत खात्यावर व्याजही मिळते.
पोस्ट खात्याचे आवर्ती ठेव खाते रोखीने अथवा धनादेश देऊन उघडता येते. खाते उघडल्यापासून तीन वर्षांनंतर मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी आहे. खाते मुदतपूर्व बंद केल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वेळोवेळी लागू होणाऱ्या दराने व्याज देईल. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. कोणत्याही पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये कितीही खाती उघडता येतात. व्याजदर ही चांगला मिळतो.
रोखीने/धनादेशाने खाते उघडता येते. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते. लहान मुलांच्या नावे खाते उघडता येते. मोठे झाल्यावर त्यांच्या नावात बदल करता येतो. आकर्षक व्याजही मिळते.
किसान विकास पत्रातही तुम्ही गुंतवणूक करु शकता. या योजनेअंतर्गत (KVP Scheme ) व्याजदर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. या योजनेचा कालावधी 9 वर्षे 4 महिने एवढा आहे. किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.