नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : पोस्टाच्या योजना सामान्य जनतेत आजही विश्वासार्ह मानल्या जातात. अनेक बचत योजना लोकांमध्ये प्रसिध्द आहेत. भारतीय पोस्ट ऑफीस अनेक प्रकारच्या स्मॉल सेव्हींग स्कीम योजना राबवित असते. जर तुम्हाला पोस्टात बचत करायची असेल तर किसान विकास पत्र हा एक चांगला पर्याय आहे. पोस्टाची ही योजना आधी पेक्षा अधिक फायदेशीर झाली आहे. कारण आता गुंतवलेली रक्कम 120 महिन्यांऐवजी आता 115 महिन्यात दुप्पट होणार आहे. सध्या या योजनेला वार्षिक सात टक्के व्याज मिळत आहे.
किसान विकास पत्रात गुंतवणूकीची रक्कम 115 महिन्यात दुप्पट होणार आहे. जानेवारी 2023 मध्ये सरकारने किसान विकास पत्राच्या मॅच्युरीटीचा काळ 123 महिन्यांवरुन घटवून 120 महिना केला होता. आता हा कालावधी आणखी कमी करीत 115 महिने केला आहे. पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार किसान विकास पत्रात गुंतवणूक केलेल्या रकमेवरील व्याजाची गणना कम्पाऊडींग आधारावर होते.
किसान विकास पत्र योजनेत दहा वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तीचे खाते खोलता येते. त्याच्या वतीने सज्ञान व्यक्तीला खाते उघडता येते. अल्पवयीन व्यक्तीचे वय दहा वर्षांचे होताच अकाऊंट त्याच्या नावावर ट्रान्सफर केले जाते. पोस्टात अकाऊंट उघडणे सोपे आहे. पोस्ट ऑफीसमध्ये अर्ज भरावा लागतो. नंतर गुंतवणूकीची रक्कम रोख, चेक किंवा डीमांड ड्राफ्टने जमा केली जाते. अर्जासोबत ओळखपत्र भरावे लागते. किसान विकास पत्र ही एक स्मॉल सेव्हींग स्कीम असून दर तीन महिन्याला सरकार या योजनेतील व्याजाचा आढावा करीत असते. त्यात बदल करते.
किसान विकास पत्रातील गुंतवणूकीवर सरकार 7.5 टक्के वार्षिक व्याज देते. यात आपण हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. त्यानंतर शंभर रुपयांच्या मल्टीपल प्रमाणात गुंतवणूक करता येते. या योजने कमाल रकमची मर्यादा नाही. तुम्ही जॉईंट खाते उघडूनही गुंतवणूक करु शकता. तसेच नॉमिनीची देखील सुविधा आहे.