जर तुमचा भविष्यात गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर पेस्ट ऑफीसच्या बचत योजना (Saving Schemes) तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतात. पोस्ट ऑफीसच्या योजनांचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे तुम्हाला चांगला परतावा तर मिळतोच सोबत तुमचा पैसा देखील सुरक्षीत राहातो. समजा तुम्ही जर बँकेच्या एखाद्या योजनेत पैसा गुंतवला आणि बँक जर दिवाळीखोरीत (Bank Default) निघाली तर तुम्हाला सरकारी नियमानुसार केवळ पाच लाखांपर्यंतचीच रक्कम परत मिळते. मात्र पोस्टाच्या (Post Office) योजनांमध्ये असे होत नाही, तुम्हाला तुमची सर्व रक्कम ती देखील संपूर्ण परताव्यासह परत मिळते. आज आपण पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो सोबतच तुमची गुंतवणूक देखील सुरक्षीत राहाते. या योजनेचे नाव आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी
तुम्ही पोस्टाच्या या योजनेंतर्गंत पैसे गुंतवल्यास तुम्हाला गुंतवणुकीवर वार्षिक आधारावर 6.8 टक्के व्याज दिले जाते. या योजनेतील व्याज एका ठराविक कालावधिनंतर कमी जास्त होत राहाते. मात्र एक एप्रिल 2020 पासून या योजनेवर 6.8 टक्के व्याज देण्यात येत आहे. तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी 1000 रुपये भरून खाते ओपन करावे लागते. जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवावी याला काही मर्यादा नाही, तुम्ही या योजनेंतर्गंत कितीही रक्कम गुंतवू शकता.
जो व्यक्ती भारताचा नागरिक आहे आणि ज्याने आपल्या वयाचे अठारा वर्ष पूर्ण केले आहेत असा कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. लहान मुले देखील त्यांच्या पालकांच्या संमतीने या योजनेत खाते ओपन करू शकतात. या योजनेत पैसे गुंतवणूक करण्याचा मुख्य लाभ म्हणजे आयकर कायद्याचे कलम 80C नुसार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला करातून सूट मिळते. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकता.
अनिल अंबानींचा रिलायन्स पॉवरच्या संचालकपदाचा राजीनामा
Inflation: महागाईचा आणखी एक मोठा झटका; एप्रिलपासून आठशेपेक्षा अधिक औषधांच्या दरात वाढ