नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : नोकरीपेशा, व्यापारी, व्यावसायिक प्रत्येक जण बचत करतोच. भविष्यासाठी, काही योजनांसाठी ही बचत करण्यात येते. पण बचत अशा ठिकाणी करावी, जिथून जोरदार परतावा मिळेल. तुम्ही पण गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट खात्यातील (Post Office Scheme) ही योजना तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. सुरक्षित परताव्यासाठी पोस्टाच्या योजना चांगल्या आहेत. या योजनांवर केंद्र सरकार हमी घेते. त्यामुळे तुमचा पैसा बुडण्याची भीती नसते. पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना चालविते. त्यानुसार फायदे मिळतात. या योजनेत केवळ 115 महिन्यात पैसा डबल होतो. व्याजदारच्या (Interest Rate) बळावर गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळतो. या योजनेत सध्या 7.5 टक्के वार्षिक व्याज देण्यात येत आहे.
व्याजदरात वाढ
तरी ही योजना किसान विकास पत्र ही आहे. ही योजना लोकप्रिय आहे. किसान विकास पत्र ही भारताची वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. यामध्ये मुदतीत तुमचा पैसा दुप्पट होतो. किसान विकास पत्र देशातील सर्व टपाल खात्यात उपलब्ध आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी किसान विकास पत्रावरील व्याजदरात वाढ केली आहे. व्याज दर 7.2 टक्क्यांहून आता 7.5 टक्के वार्षिक करण्यात आला आहे.
झटपट रक्कम दुप्पट
किसान विकास पत्र योजनेत व्याज दरात मोठी वाढ होते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होतो. या योजनेत गुंतवणुकीवर परताव्याचा कालावधी सातत्याने घटत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2023 रोजी या योजनेत मॅच्युरिटी कालावधी 120 महिने होता. त्यापूर्वी तो 123 महिने होता. आता रक्कम दुप्पट होण्याचा कालावधी 115 महिन्यावर आला आहे. कम्पाऊंडिग आधारे या योजनेत व्याजदराची गणना होते.
कोणाला करता येईल गुंतवणूक?
किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूक करण्याचे वय कमीत कमी 18 वर्षे आहे. या योजनेत एकल खाते आणि संयुक्त खाते काढता येते. लहान मुलांच्या नावे पण योजनेत गुंतवणूक करता येते. हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट यांना या योजनेत गुंतवणूक करता येते.
अशी करता येईल गुंतवणूक
किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूक करण्यासाठी 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंत प्रमाणपत्र खरेदी करता येतात. 200 रुपयांच्या पटीत सुद्धा योजनेत गुंतवणूक करता येते. त्यानुसार या योजनेत परतावा मिळेल. या योजनेत आता 115 महिन्यात परतावा मिळतो.
असा मिळतो परतावा
समजा या योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर या योजनेत 7.5 टक्के दराने व्याज मिळते. 115 महिन्यात, म्हणजे 9 वर्षे आणि 7 महिन्यात ही गुंतवणूक 20 लाख रुपये होईल. केंद्र सरकार दर तीन महिन्याला व्याजदर निश्चित करत असल्याने या परताव्यात बदल होऊ शकतो.