नवी दिल्ली : तुमच्या लाडक्या लेकीच्या (Child) भविष्यासाठी तुम्हाला आर्थिक तरतूद करायची असेल तर ही सरकारी योजना तुमच्यासाठीच आहे. कारण या योजनेत जोखीम कमी आहे. पण परताव्याची हमी मिळते. बचतीची (Saving) सवय असेल तर तुमची मुलगी मोठी होताना या सवयीचा फायदा मिळेल. या योजनेत तुम्हाला मुदत ठेव आणि आवर्ती मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा मिळेल. पोस्ट ऑफिसच्या (Post Office) सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana- SSY) तुम्हाला जोरदार परतावा मिळेल.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीत जोखीम अधिक असते आणि परतावा ही तसाच मिळतो. पण अल्प बचत योजनेत (Small Savings) सर्वाधिक व्याज मिळते. या योजनेत दीर्घकालीन कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास कम्पाऊंड व्याजामुळे तुम्हाला फायदा मिळतो.
सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन म्युच्युरिटी योजना आहे. या योजनेतून तुम्हाला मुलीच्या शिक्षणाची, लग्नाची तरतूद करता येते. या योजनेत वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळते. या योजनेत अल्प बचत योजना एफडी (FD), आरडी (RD), एनएससी (NSC) आणि पीपीएफ (PPF) पेक्षा जास्त परतावा मिळतो.
या योजनेत जोखीम नसल्याने तुम्हाला त्याचा सर्वाधिक फायदा होतो. तुम्हाला तुमच्या रक्कमेची हमी मिळते. त्यावर व्याज मिळते. सध्या त्याचा व्याजदर ही जास्त आहे. पोस्ट खात्यातील योजना असल्याने त्यात 100 टक्के सुरक्षेची हमी मिळते.
सुकन्या समृद्धी योजना ही करमुक्त योजना आहे. या योजनेत EEE म्हणजे तीन वेगवेगळ्या स्तरावर कर सवलत मिळते. पहिली सवलत आयकर कायदा कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. रिटर्नवर कर लागत नाही. तसेच मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या एकूण रक्कमेवरही कर सवलत मिळते.
SSY योजनेवर दरवर्षी कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत दर महिन्यालाही गुंतवणूक करता येते. जास्त परतावा हवा असेल तर तुम्हाला दर महिन्याला 10 हजार आणि वर्षाला 120000 रुपयांची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
SSY योजनेत मॅच्युरिटी 21 वर्षांची आहे. म्हणजे तुमची मुलगी एक वर्षांची असताना खाते उघडल्यास 22 वर्षांनी योजना मॅच्युअर होईल. मुलगी 3 वर्षांची असेल तर 24 व्या वर्षी ती मॅच्युअर होईल. या योजनेत 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. उर्वरीत वेळेत या योजनेत व्याज मिळते.