PHOTO | पोस्ट ऑफिसच्या 7 सुपरहिट योजना; तयार करू शकता बिग बँक बॅलन्स, जाणून घ्या डिटेल माहिती
Post Office Schemes : आपल्याला पैसे गुंतवायचे असतील आणि चांगले व्याज तसेच सुरक्षिततेची हमी पाहिजे असेल तर पोस्ट ऑफिस हा सर्वोत्तम पर्याय आहे. ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये सध्या बऱ्याच खास योजना आहेत. (post office's superhit plans; Can create Big Bank Balance, know the details)
एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघांचा विमा, केवळ 4 हजारांत सुरू करा पॉलिसी
Follow us on
गॅरंटीने दुप्पट पैसे मिळवून देणारी पोस्टाची योजना
पोस्ट ऑफिसची ही गुंतवणूक योजना खूप लोकप्रिय आहे. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी) मध्ये सध्या वार्षिक आधारावर 6.8 टक्के व्याज मिळते. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीत पात्र आहे. आपण या योजनेत 5 वर्षे गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस मुदत ठेव (FD) मध्ये आपण निश्चित कालावधीसाठी एकरकमी रक्कम गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटमध्ये एक ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. यामध्ये निश्चित परतावा आणि व्याज देयकाचा फायदा मिळतो. मुदत ठेव (FD) खाती चार मॅच्युरिटी कालावधीसाठी उघडता येतात – एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे. या योजनेत आपण आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता.
सरकार एनपीएसमध्ये करणार हा मोठा बदल
आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धि योजना हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत सध्या तुम्हाला 7.6 टक्के परतावा मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अन्वये कर कपातीचा फायदादेखील मिळतो.
post office scheme 2021
दररोज एवढी करा बचत आणि सेवानिवृत्तीनंतर मिळवा 1 कोटी रुपये, जाणून घ्या याबाबत अधिक माहिती