नवी दिल्ली : भारतात रेल्वेने कोट्यवधी लोक सफर करतात. पण ट्रेनमधील प्रवासाचे अनेक नियम (Railway Rule for Passengers) आहेत. पण त्याविषयी प्रवाशांना फार कमी माहिती असते. अनेकदा प्रवासादरम्यान योग्य बर्थ (Berth) मिळत नाही. त्यामुळे रात्रीचा प्रवास सुखकर होत नाही. तुम्ही प्रवास (Journey) सुरु केल्यावर एक एक नियम समोर येतो आणि आपली भांबेरी उडते. अनेकदा मध्यम बर्थवरुन (Middle Berth) खास वाद होतात. अशावेळी प्रवासा दरम्यान या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रवासादरम्यान अनेकदा प्रवाशी मिडल बर्थ घेत नाहीत. हा बर्थ टाळण्याचा ते प्रयत्न करतात. कार, लोअर बर्थवर अनेकदा प्रवासी बसलेले असतात. त्यामुळे मिडल बर्थवाल्या प्रवाशाची मोठी अडचण होते. त्याला झोप आलेली असताना त्याला सहन करावे लागते.
मध्यम बर्थ वर प्रवास करताना अनेक अडचणी येतात. अनेकदा ट्रेन सुरु होताच मध्यम बर्थवाले तो उघडतात. त्यामुळे लोअर बर्थवरील माणसांना अडचण येते. त्यांना बसता येत नाही. त्यांना एकतर खाली वाकून बसावे लागते. अथवा सरळ अंग टाकून मोकळे व्हावे लागते.
प्रवासादरम्यान ट्रेनमधील बर्थवरुन होणारी ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने काही नियम तयार केल आहेत. रेल्वेने या संबंधीचे नियम तयार केले आहेत. मध्यम बर्थवर रात्री 10 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत बर्थ उघडता येते. पण त्यानंतर त्याला नियमानुसार आडकाठी येते.
पण एखादा प्रवासी रात्री 10 वाजेपूर्वी मध्यम बर्थ उघडत असेल तर तुम्ही त्याला त्यापासून रोखू शकता. तसेच एखादा लोअर बर्थवरील माणूस मध्यम बर्थ उघडू देत नसेल तर त्याला नियम दाखवून बर्थ उघडता येतो.
पण सकाळी 6 वाजेपर्यंतचा मध्यला बर्थवरील व्यक्तीला या सुविधेचा लाभ घेता येतो. त्यानंतर त्याला बर्थ पुन्हा मोकळा करावा लागतो. कारण लोअर बर्थवरील व्यक्तीला बसण्यासाठी ही सुविधा द्याव लागते. नियमानुसार यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही.