नवी दिल्ली | 28 February 2024 : भारतीय रेल्वेने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे तिकीटाच्या किंमती अर्ध्यावर आणल्या आहेत. या मोठ्या कपातीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावरील भार कमी झाला आहे. कोरोना काळात भारतीय रेल्वेने सर्व प्रकारच्यी तिकीटाचे दर वाढवले होते. तर रेल्वेच्या अनेक योजनांना, तिकीट सवलतींना पण कात्री लावली होती. आता तिकीट दर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅसेंजर ट्रेनसाठी (Passenger Trains Ticket) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पॅसेंजरच्या तिकीट दरात 40 ते 50 टक्के घसरण झाली आहे. मध्य रेल्वेचा (Central Railway) हा निर्णय पॅसेंजर ट्रेनला लागू असेल. कोरोना काळात तिकीटाचे दर दुप्पट झाले होते.
एक्सप्रेस ट्रेन इतके भाडे
पॅसेंजर ट्रेनचा किराया कमी करण्याची मागणी फार जूनी होती. पॅसेंजर असोसिएशन्सने या वाढलेल्या किरायाविरोधात आवाज उठवला होता. प्रवाशांच्या खिशावर या भाडेवाढीचा ताण येत होता. त्यासाठी अधिक पैसा मोजावा लागत होता. पॅसेंजर ट्रेनसाठी एक्सप्रेस ट्रेनच्या सारखा किराया द्यावा लागत होता. त्यामुळे रोज पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर ताण येत होता.
सर्वात कमी भाडे 30 रुपये रुपये
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पॅसेंजर आणि मेमून ट्रेनच्या दुसऱ्या वर्गाचे भाडे, किराया कोविड 19 (COVID-19) नंतर 10 रुपयांहून वाढून 30 रुपये झाले होते. या तिकीटांना पॅसेंजर ट्रेनऐवजी एक्सप्रेस स्पेशल (Express Specials) आणि मेमू/डेमू एक्सप्रेसचे (MEMU/DEMU Express) नाव देण्यात आले होते. आता ही पद्धत बदलण्यात आली आहे. हा निर्णय मंगळवारी, 27 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.
सर्वच एक्सप्रेस स्पेशल आणि मेमू ट्रेनसाठी निर्णय लागू
या अधिसूचनेनुसार, मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (MEMU) ट्रेन आणि झिरो क्रमांकापासून सुरु होणाऱ्या सर्व पॅसेंजर ट्रेनच्या किरायात 50 टक्क्यांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. तर अनारक्षित तिकीट प्रणाली ॲपच्या (UTS App) किरायात पण बदल करण्यात आला आहे. पूर्वी पॅसेंजर ट्रेन व नंतर एक्सप्रेस स्पेशल आणि मेमू ट्रेन या नावाने असलेल्या देशभरातील या सर्व ट्रेनसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी कोविड 19 मधील लॉकडाऊनमध्ये (Covid 19 Lockdown) रेल्वेने त्यांच्या सर्व ट्रेन बंद केल्या होत्या. लॉकडाऊन नंतर हळूहळू रेल्वेची सेवा पूर्वपदावर आली. त्यावेळी जनतेला वाढीव दराचा फटाका सहन करावा लागला.