Raksha Bandhan 2023 : MSSC योजनेत करा गुंतवणूक, बहिणीला द्या अनोखी भेट

| Updated on: Aug 30, 2023 | 5:53 PM

Raksha Bandhan 2023 : रक्षा बंधनाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही बहिणीला एक छान गिफ्ट देऊ शकता. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करुन तुमच्या लाडक्या बहिणीच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करु शकता. काय आहे ही योजना, काय आहे तिचे वैशिष्ट्ये

Raksha Bandhan 2023 : MSSC योजनेत करा गुंतवणूक, बहिणीला द्या अनोखी भेट
Follow us on

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : रक्षा बंधनाचा सण (Raksha Bandhan 2023) शुभ मुहूर्तावर पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. या मुहूर्तावर तुम्ही बहिणीला एक खास गिफ्ट देऊ शकता. तिच्या भविष्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत (Mahila Samman Saving Certificate) गुंतवणूक करु शकता. तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करु शकता. ही योजना यंदा 1 एप्रिल 2023 रोजीपासून सुरु करण्यात आली.या योजनेत महिला वा लहान मुलीच्या नावे 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. या योजनेतील गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळते.

असे उघडा खाते

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे खाते देशातील कोणत्याही महिलेस अथवा मुलीच्या नावे पालकांना काढता येते. योजनेतंर्गत 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येते. या योजनेत गुंतवणूकदारांना एकल प्रकारचे खाते उघडता येईल. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते.

हे सुद्धा वाचा

इतकी रक्कम करता येते जमा

या योजनेत गुंतवणूकदारांना 7.5 टक्के निश्चित व्याज देण्यात येते. दोन वर्षांच्या कार्यकाळात, महिला अथवा लहान मुलींच्या नावे दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतविता येईल. कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतील. वार्षिक 7.5 टक्के व्याज तिमाहीत जमा होईल.

असा मिळतो परतावा

गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर व्याजाची रक्कम मिळेल. या योजनेत एखाद्या लाभार्थ्याने 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पहिल्या तिमाहीत या रक्कमेवर 3,750 रुपयांचे व्याज मिळेल. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी या रक्कमेवर दुसऱ्या गुंतवणुकीवर 3,820 रुपये व्याज मिळेल. यापद्धतीने ज्यावेळी बाँड मॅच्युर होईल, तेव्हा दोन लाख रुपय गुंतवणुकीवर एकूण 2,32,044 रुपये परतावा मिळेल.

व्याजावर टीडीएस

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 16 मे 2023 रोजी एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार मिळालेल्या व्याजावर कर सवलत मिळणार नाही. जर कोणत्याही आर्थिक वर्षात या योजनेतील व्याजाचा आकडा 40 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर कलम 194ए अंतर्गत टीडीएस भरावा लागेल.

किती काढता येईल रक्कम

या योजनेत गुंतवणूकदारांना दोन वर्षांपर्यंत रक्कम ठेवता येते. गरजेवेळी रक्कम काढता येते. खाते उघडल्यानंतर त्यांना एक वर्षानंतर खात्यातील रक्कम काढता येईल. एकावेळी खातेदार 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतो. लेखा कार्यालयात त्यासाठी फॉर्म क्रमांक 3 जमा करावा लागेल. त्यानंतर रक्कम प्राप्त होईल.