RBI Rupee Bank | 22 सप्टेंबरपासून या बँकेला कायमचं कुलूप, तुमच्या पैशांचं काय होणार..

| Updated on: Sep 11, 2022 | 1:21 PM

RBI Rupee Bank | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच ही बँक बंद करणार आहे. मग ग्राहकांच्या अडकलेल्या पैशांचं काय होणार..

RBI Rupee Bank | 22 सप्टेंबरपासून या बँकेला कायमचं कुलूप, तुमच्या पैशांचं काय होणार..
या बँकेला लागणार ताळं
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

RBI Rupee Bank | भारतीय रिझर्व्ह बॅक (Reserve Bank of India)लवकरच ही बँक बंद (Closed) करणार आहे. महाराष्ट्रातील या बँकेला कायमस्वरुपी कुलूप लागणार आहे. आरबीआय नेहमी बँकांसाठी नियम जाहीर करते. एखाद्या बँकेत अनियमितता आढळल्यास त्यांना दंड लावते. मात्र बँकेच्या ताळेबंदात (Balance Sheet)मोठा फरक आढळल्यास आणि अनियमितता जास्त असल्यास अशा बँकांना ग्राहकहितासाठी बंद करण्यात येते.

22 सप्टेंबर रोजी बँक होणार बंद

आरबीआयने यापूर्वी ही अनेक बँका, वित्तीय संस्थांचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार, 22 सप्टेंबर रोजीपासून या बँकेला कायमस्वरुपी ताळे लागेल. म्हणजेच याच महिन्यात ही कारवाई होईल.

बँकिंग परवाना केला रद्द

RBI ने ऑगस्ट महिन्यात पुणे येथील रुपी सहकारी बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank Limited) बँकिंग परवाना रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

हे सुद्धा वाचा

आता सर्व सेवा होणार बंद

केंद्रीय बँकेच्या या निर्णयानुसार, 22 सप्टेंबरपासून या बँकेच्या सर्व सेवा कायमस्वरुपी बंद होणार आहे. ज्या ग्राहकांचा अथवा मित्र, नातेवाईक, हितचिंतकांचा पैसा या बँकेत अडकला असेल, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

कशामुळे बँकिंग परवाना केला रद्द ?

रुपी सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसून कमाईचे आवश्यक साधनंही नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

या सेवा होतील बंद

22 सप्टेंबरपासून या बँकेचे कामकाज बंद होईल. ग्राहकांना रक्कम काढता येणार नाही. कोणताही आर्थिक व्यवहार, धनादेश वा इतर सेवांचा लाभ घेता येणार नाही.

बँकेची कुचराई

केंद्रीय बँकेच्या नियमांनुसार, बँकिंग विनियमन अधिनियम 1949 च्या नियम 56, 11(1) आणि 22 (3)(डी) चे बँकेने पालन केलेले नाही. नियम 22(3) (ए), 22 (3) (बी), 22 (3) (सी), 22 (3) (डी) आणि 22 (3) (ई) यांचेही पालन करण्यात बँकेने कुचराई केली.

5 लाख रुपये मिळणार

आता DICJC Act 1961 नुसार, गुंतवणूकदारांना त्यांच्या एकूण जमा रक्कमेवर 5 लाख रुपयांचा दावा सांगता येईल.