मुंबई : आधी कोरोना महामारी (Corona Pandemic) आणि त्यानंतर सुरु असलेल्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला अधिकच कात्री बसू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation) हा 6.07 टक्के इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. हा आतापर्यंत गेल्या आठ महिन्यातला सर्वाधिक महागाईचा दर असल्याचं मसोर आलं आहे. आरबीआयनं (Reserve Bank of India) जारी केलेल्या महागाई स्तराच्या सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईनं गाठलेला स्तर हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरतोय. खाण्याच्या वस्तू महागल्या असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांसोबतच सगळ्यांना बसू लागला आहे. सीपीआयच्या आधारे याबाबत अधिक स्पष्ट आकडेवारी जारी करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2021मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 5.03 टक्के इतका होता. तर जानेवारी 2022 मध्ये हाच दर 6.01 टक्क्यांपर्यंत पोहोचला. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातही यात वाढ होऊन आता किरकोळ महागाई ही 6.07 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई ही 13.11 टक्क्यांवर पोहोचली असल्याचं सरकारच्या डब्ल्यूपीआय डेटामधून समोर आलं. कच्च्या तेलाचच्या आणि खाण्याच्या गोष्टी महागल्याचा परिणाम इतर गोष्टींच्या दरांवरही थेट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महागाई दर वाढत असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, अल्पशा प्रमाणात खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट झाली असल्याचंही सांगितलं जातंय.
एनएसओतर्फे जारी करण्यात आलेल्या डेटानुसार खाद्यपदार्थांच्या किंमती या 5.89 टक्क्यांनी वाढल्या आहेत. महागाईचा हा जर जानेवारीच्य तुलनेत जास्त आहे. जानेवारीमध्ये 5.43 टक्क्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या होत्या.
सीपीआय म्हणजे कंझ्यूमर प्राई इंडेक्स. या द्वारे सामान आणि सेवेच्या किरकोळ बाजारातील किंमती नेमक्या किती आहे, त्यांचे दर किती वधारले आहेत किंवा घटले आहेत, याचा अभ्यास आणि त्यातील तुलना याद्वारे काढली जाते. आरबीआय अर्थव्यवस्थेत किंमती स्थिर ठेवण्यासाठी सीपीआयच्या आकड्यांचाही विचार करतं. सीपीआयमध्ये एका विशेष कमोडिटीसह किरकोळ बाजारातील किंमती काय आहेत, याचा आढावा घेतला जातो. शहरी, ग्रामीण आणि देशभरातील बाजारांतील किंमतींचे स्तर याचा अभ्यास या इंडेक्समध्ये केला जातो.
Maggie Price Hike : बच्चे कंपनीची आवडती मॅगी महागली, नवे दर लागू, वाढत्या महागाईचे चटके सुरुच
शेअर बाजारात 900 अंकांची वाढ, गुंतवणूकदारांच्या जिवात जीव! पण रुपयांचं मूल्य आणखी घसरल्यानं चिंता