Inflation | जनता पुन्हा महागाईने होरपळली, महागाई दर चढाच..

| Updated on: Sep 13, 2022 | 9:58 AM

Inflation | जुलै महिन्यात महागाई दर कमी झाला होता. पण ऑगस्ट महिन्यात महागाईने पुन्हा चढाई केली. त्यामुळे जनता पुन्हा महागाईने होरपळली

Inflation | जनता पुन्हा महागाईने होरपळली, महागाई दर चढाच..
महागाई दर वाढला
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Inflation | देशात महागाईच्या(Inflation) मोर्चावर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. किरकोळ महागाईचा (Retail Inflation) दर जुलै महिन्यात कमी होता. पण ऑगस्ट महिन्यात महागाईने पुन्हा डोके वर काढलं आणि जनता त्यामध्ये होरपळली. किरकोळ महागाई दराने पुन्हा 7 टक्क्यांवर पोहचला.

जुलै महिन्यात दर कमी

सरकारने सोमवारी किरकोळ महागाईचे आकडे जाहीर केले. यापूर्वी जुलै महिन्यात किरकोळ महागाई घटली होती. हा दर 6.71 टक्के होता.

तीन महिन्यांत दर काय

यापूर्वी जून महिन्यात हा आकडा 7.01 टक्के होता. मे महिन्यात 7.04 टक्के आणि एप्रिल महिन्यात हा दर 7.79 टक्के होता.

हे सुद्धा वाचा

RBI च्या लक्ष्यापेक्षा जास्त

देशातील किरकोळ महागाई दर सलग 8 व्या महिन्यात सर्वात जास्त आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्धारीत महागाई लक्ष्यापेक्षा हा आकडा जास्त आहे. RBI नुसार हा दर 6 टक्के असणे आवश्यक आहे. पण सध्यातरी हा दर कमी होण्याची चिन्ह नाहीत.

खाद्यान्न महाग

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, खाद्य वस्तूंचा (food Product) महागाई दर 7.62 टक्के होता. हा दर जुलै महिन्यात 6.69 टक्के होता. गेल्या वर्षी याच महिन्यात हा दर केवळ 3.11 टक्के होता.

या आघाडीवर सर्वसामान्य बेजार

भाजीपाला, मसाले, पादत्राणे, इंधन आणि वीज या क्षेत्रात महागाई प्रचंड वाढली आहे. या क्षेत्रात वार्षिक 10 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. तर अंडे स्वस्त झाले. मटन आणि माशांच्या दरात फार बदल झालेला नाही.

औद्योगिक उत्पादनात वाढ

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) सोमवारी आकडेवारी जाहीर केली. औद्योगिक उत्पादन सूचकांक(IIP) आकडे घोषीत करण्यात आले. जुलै महि्यात उत्पादनात 2.4 टक्के वाढ झाली. एक वर्षांपूर्वी याच महिन्यांत हा वृद्धी दर 11.5 टक्के होता. पूनर्उत्पादन दर 3.2 टक्के, वीज उत्पादन दर 2.3 टक्के वाढला. खणीज क्षेत्रात उत्पादन दर 3.3 टक्क्यांनी घसरला आहे.