SAMADHAN | कोणतीही व्यक्ती मोठ्या उम्मीदेने कंपनीत नोकरी(Jobs) करते. नोकरीतील उत्पन्नातूनच (Payments)आपण आपल्या कच्च्या-बच्च्यासह संसाराचा गाडा हाकतो. काही बचत भविष्यासाठी राखून ठेवतो. बऱ्याचदा आपण पाहतो, अथवा ऐकतो की बरेच कर्मचारी त्यांच्या नोकरीत खूश (Not happy with work culture) नसतात. त्यांना कार्यालयात नाहक त्रास दिल्या जातो. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय (Labour Ministry) अशा कर्मचाऱ्यांच्या मदतीला धाऊन आले आहे.
काही ठिकाणी कोणतेही ठोस कारण न देता कर्मचाऱ्याला कामावरुन कमी करण्यात येते. जर तुम्ही ही कंपनीच्या अशा नाहक त्रासापासून त्रस्त असाल तर तुम्ही तक्रार दाखल करु शकता.
बडतर्फी, सेवेतून अचानक कमी करणे, सेवा समाप्त करणे यासंदर्भात तुम्ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या समाधान पोर्टलवर तक्रार करु शकता.
कामगार कायद्यानुसार, बडतर्फी, सेवा समाप्तीविरोधात कर्मचाऱ्याला आवाज उठवता येतो. संबंधित अधिकाऱ्यासमोर हा मुद्दा उपस्थित करता येतो.
जर तुम्ही कंपनीत काम करत असाल. याठिकाणी ठोस कारण न देता तुम्हाला बडतर्फ करण्यात आले असेल. नोकरीतून कमी केले असेल अथवा सेवा समाप्त केली असेल तर तुम्ही तक्रार दाखल करु शकता. samadhan.labour.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करता येईल.
अगर आपको अपने नियोक्ता से कोई शिकायत या परेशानी है तो समाधान पोर्टल पर जाकर शिकायत दर्ज कर सकते है|#AzadiKaAmritMahotsav #Samadhanportal pic.twitter.com/3PaJZl96bH
— Ministry of Labour (@LabourMinistry) September 1, 2022
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याविषयीचे ट्विट केले आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मंत्रालयाने ट्विट केले आहे. त्यात कंपनीत छळ होत असेल अथवा कामावर समाधानी नसाल तर नियोत्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.