नवी दिल्ली : आपण अनकेदा सातत्याने लॅपटॉप (Laptop), पीसीसमोर (PC) बसलेली माणसं पाहतो. कधी पहावं तर हे पठ्ठे आपलं स्क्रीनसमोरच (Screen) असतात. त्यांची पाठ दुखते, मान दुखते, डोळे तर पार कामातून जातात. पण त्यांचं काम काही आवरत नाही. त्यांच्याासाठी ही आयडियाची कल्पना आली आहे..
तर सॅमसंग कंपनीने ही आयडियाची कल्पना लढवली आहे. जास्त काम करणाऱ्या म्हणेजच वर्कहोलिक (Workaholic) लोकांसाठी कंपनीने खास माऊस(Mouse) आणला आहे.
समजा तुमचे काम अवघ्या 8 तासांचे आहे. त्यापेक्षा जर तुम्ही अधिक काळ काम करण्याचा प्रयत्न केला तर हा उंदिर मामा तुम्हाला काही काम करु देणार नाही.
म्हणजे सेट केलेल्या टायमिंगनंतर तुम्ही जर काम करणार असेल तर हा माऊस स्क्रीनसमोरुन चक्क पळ काढेल. धक्का बसला ना. पण हा माऊस काही केल्या तुम्हाला काम करु देणार नाही.
सर्वसाधारण माऊस सारखाच हा माऊस असेल. पण याच्या फिचरमुळे तो खास असेल. याला सॅमसंग बँलन्स माऊस (Samsung Balance Mouse) असे नाव देण्यात आले आहे.
जास्त काम करण्याची सवय असणाऱ्या लोकांसाठी हा माऊस आणण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांनाही फायदा होईल. अनेक कर्मचारी नाहक रेंगाळत काम करतात. त्यांच्यासाठी हा माऊस वरदान ठरणार आहे.
हा माऊस ठराविक वेळेनंतर स्क्रीनसमोर थांबणार नाही. त्यामुळे तुम्हाला काम करताना अडचणी येतील. त्यामुळे वेळेत काम करण्याची सवयही लागेल. तसेच अधिक वेळ काम करण्यात अडचण येईल.
या माऊसला सेन्सर असेल. तसेच त्याला चाकंही असतील. त्यामुळे एका मर्यादीत वेळेनंतर हा माऊस स्वतःहून स्क्रीनसमोर थांबणार नाही. तो पळ काढेल.
कर्मचाऱ्यांवरील कामाचा दबाव कमी करण्यासाठी आणि कंपन्यांना वर्क कल्चर डेव्हलप होण्यासाठी हा फंडा फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे शोषणही कमी होईल, असा दावा कंपनीने केला आहे.
ओव्हरटाईमला सुरुवात झाल्याबरोबर या माऊसची चाके बाहेर येतात. तो पळतो. त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे पार्टही बाहेर पडतील.
कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेव्यतिरिक्त ऑफिसमध्ये थांबू न देण्यासाठी हा माऊस उपयोगी ठरणार आहे. लवकरच हा माऊस बाजारात उपलब्ध होणार आहे. मग तुम्ही घेणार की नाही हा खास उंदिरमामा, तुमच्या कुटुंबियांना वेळ देण्यासाठी..