Savings scheme: आरडीचे खाते कुठे ओपन करणे फायदेशीर बँकेत की पोस्टात? जाणून घ्या दोन्हीमधला फरक

| Updated on: Apr 24, 2022 | 2:16 PM

आरडीचे खाते (RD account) नेमके कुठे ओपन करावे पोस्टामध्ये (post) की बँकेत? गुंतवणुकीवर कुठे व्याज दर (Interest rate) अधिक मिळेल याबद्दल ग्राहकांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. आज आपन या दोन खात्यामधील फरक जाणून घेणार आहोत.

Savings scheme: आरडीचे खाते कुठे ओपन करणे फायदेशीर बँकेत की पोस्टात? जाणून घ्या दोन्हीमधला फरक
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: twitter
Follow us on

आरडीचे खाते (RD account) नेमके कुठे ओपन करावे पोस्टामध्ये (post) की बँकेत? गुंतवणुकीवर कुठे व्याज दर (Interest rate) अधिक मिळेल याबद्दल ग्राहकांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. आरडीचे खाते बँकेत ओपन करावे की? पोस्टात याबाबत ग्राहकांचा अनेकदा गोंधळ उडतो. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी एक गोष्ट विचारात घ्या तुम्हाला व्याज दर कुठे अधिक मिळणार पोस्टात की बँकेत. यामागे एक सोपे गणित आहे, ते म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला जितके अधिक व्याज मिळणार तिकती तुमच्या उत्पनात वाढ होणार आहे. त्यामुळे नक्की गुंतवणूक कुठे करावी हे ठरवण्यासाठी आपन बँक आणि पोस्ट ऑफीसमध्ये उघडण्यात येणाऱ्या आरडीबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही पोस्ट ऑफीसमध्ये कितीही आरडी उघडू शकतात. त्यावर चांगले व्याज देखील मिळते. तीच प्रक्रिया बँकेत देखील आहे. बँकेत देखील तुम्ही आरडीचे खाते उघडू शकता. चला तर मग पोस्ट आरडी आणि बँक आरडीमधील मूलभूत फरक जाणून घेऊयात.

पोस्टाची आरडी

तुम्ही जर पोस्ट ऑफीसमध्ये आरडीचे खाते ओपन केले तर तुम्हाला गुंतवणुकीवर 5.8 टक्के व्याज दर मिळतो. मात्र त्यासाठी तुम्हाला पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. पोस्टामध्ये आरडी खात्याची मर्यादा कमीत कमी पाच वर्षांची आहे. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी पोस्टात आरडी खाते ओपन करता येत नाही. पोस्ट ऑफीसमध्ये आरडीवर मिळणाऱ्या व्याज दरात बदल होऊ शकतो, सध्या ग्रहकांना आरडीवर 5.8 टक्के व्याज मिळत आहे. आरडीवरील व्याज दर वाढल्यास ग्राहकांना अधिक चांगला परतावा मिळतो, मात्र कधीकधी व्याज दर कमी होण्याची देखील शक्यता असते. बँकेच्या तुलनेत पोस्टामध्ये केलेली गुंतवणूक अधिक सुरक्षीत माणण्यात येते.

बँकेची आरडी

आता बँकेच्या आरडीबद्दल जाणून घेऊयात, तुम्हाला जर बँकेत आरडी ओपन करायची असेल तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, बँकेत आरडीचे दर स्थिर असतात. म्हणजे समजा बँकेत आरडीवर 5.10 टक्के व्याज दर आहे, आणि त्याचवेळी तुम्ही जर बँकेत आरडी खाते ओपन केले तर मुदत संपेपर्यंत तोच व्याज दर फिक्स राहातो. व्याज दर कमी अथवा जादा करण्यात येत नाही. जर तुम्हाला फिक्स व्याज दर हवा असेल तर तुम्ही बँकेत आरडीचे खाते ओपन करू शकता.

संबंधित बातम्या

वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, ओला इलेक्ट्रिक कंपनीचा मोठा निर्णय; 1,441 ई-स्कूटर्स परत मागवल्या

कर्जात बुडालेल्या देशांना बाहेर काढण्याची गरज; आर्थिक संकटात सापडलेल्या देशांबद्दल भारताला चिंता – निर्मला सितारमण

Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ