SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) म्युच्युअल फंडांनी (Mutual Fund) परताव्यात कमाल केली आहे. या फंडअंतर्गत गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप म्यूचुअल फंडात गुंतवणुकीची संधी मिळते. इतर फंडांशी तुलना करता सध्या एसबीआयच्या फंडांनी जोरदार कामगिरी केल्याचा दावा करण्यात येत आहे. 10 वर्षांच्या परताव्याच्या आलेखावर नजर टाकली तर एसबीआय म्युचुअल फंडाने गुंतवणूकदारांना (Investors) 9 पटीत परतावा दिल्याचे दिसून येईल. गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे (SIP) गुंतवणूक केली असल्यास त्यांना अधिकचा फायदा झाला आहे. एसबीआय गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळाला आहे. एसबीआयच्या म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचा लेखाजोखा पाहुयात.
एसबीआई स्मॉल कॅप फंडच्या कामगिरीचा विचार करता, या फंडाने 10 वर्षांत 25 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. ज्यांनी या फंडामध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली, 10 वर्षानंतर त्यांना 9 लाख रुपये रिटर्न मिळाले आहेत. तर एसआयपीद्वारे दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना या फंडात 22.5 लाख रुपये मिळाले आहेत. एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंडामध्ये कमाल 5000 रुपये आणि किमान 500 रुपयांची एसआयपी सुरु करता येते.
एसबीआय टेक अपॉर्चुनिटीज फंडने गुंतवणूकदारांना 10 वर्षांमध्ये 18 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. ज्यांनी या फंडात 1 लाख रुपये गुंतवणूक केली आहे, त्यांना 10 वर्षांत 5.28 लाख रुपये मिळाले आहेत. या फंडामध्ये 5000 रुपये मासिक एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना 15.5 लाखांचा परतावा मिळाला आहे. एसबीआय टेक अपॉर्चुनिटीज फाऊंडमध्ये कमाल 5000 रुपये आणि किमान 500 रुपये एसआयपीद्वारे गुंतवणूक करता येते.
एसबीआय मॅग्नम मिडकैप फंडने गुंतवणूकदारांना 10 वर्षांमध्ये 20 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या फंडात 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर 10 वर्षात 6.16 लाख रुपये त्याला मिळाले असते. 5000 रुपयांच्या एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडने 16.5 लाखांचा परतावा दिला आहे. याशिवाय एसबीआय कंजम्पशन अपॉर्चुनिटीज फाऊंडने 10 वर्षांमध्ये 17.87 टक्के सीएजीआर परतावा दिलेला आहे. एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना 10 वर्षांनी 5.18 लाख रुपये मिळाले तर
5000 रुपयांच्या एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडने 14 लाख रुपयांचा परतावा दिला आहे.
एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड ने गुंतवणूकदारांना 10 वर्षांमध्ये 18 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना 10 वर्षांनी 5.28 लाख रुपये मिळाले तर 5000 रुपयांच्या एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडने 15.5 लाख रुपयांचा परतावा दिला आहे.