नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आदेशानंतर आता देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 19 मे रोजी, शुक्रवारी या गुलाबी नोटा माघारी बोलविण्याची घोषणा झाली. त्यानुसार, 23 मेपासून या नोटा बँकेत जमा करुन घेण्यात येत आहेत. आता मे जवळपास संपणार आहे. एक आठवड्यानंतर जून महिना सुरु होईल. त्यात शनिवार-रविवारची सुट्टी आलेली आहे. त्यामुळे बँकेत या नोटा बदलविण्यासाठी जाण्यापूर्वी जून महिन्यात किती दिवस बँका बंद (Bank Closed) राहतील हे जाणून घ्या.
जून महिन्यात इतक्या दिवस सुट्टी
तुम्ही बँकेत नोटा बदलविण्यासाठी जाणार असाल तर अगोदर जून महिन्यात किती दिवस बँकांना ताळे लागलेले असेल, ते माहिती करुन घ्या. त्यानंतर बँकेत जाण्याची तयारी करा. आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, रविवार आणि शनिवार मिळून जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. देशात वेगवेगळ्या प्रांतातील प्रथा, सण, उत्सव याप्रमाणे बँकांना सुट्टी असते. जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहतील.
महत्वपूर्ण बदल
RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे एका मर्यादेपर्यंत या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज अथवा ओळखपत्र दाखविण्याची गरज नाही.
रोख द्या आणि रोख न्या
आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.
व्यावसायिक माध्यम केंद्रात किती नोटा बदलता येतील
बँकांच्या व्यावसायिक माध्यम केंद्रात किती नोटा बदलता येतील, असा एक सवाल विचारण्यात येतो. तर या बिझनेस करस्पॉन्डेंट सेंटरवर खातेदाराला 4000 रुपयांपर्यंत नोटा बदलविता येतील
जून महिन्यातील सुट्यांची यादी