नवी दिल्लीः सध्याची ‘महागाई’ (Inflation) तुमचा ‘खिसा’ कसा कापत आहे, याबद्दल फार काही सांगण्याची गरज नाही. बाजारातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही कुठल्या दुकानात गेलात, तरी तुम्हाला प्रत्येक गोष्ट महाग मिळेल. फळांचे दुकान असो वा भाजीपाला, रेशन दुकान असो की किराणा दुकान, सगळीकडे नुसतीच महागाई असते. मात्र, आजकाल एक गोष्ट अशी आहे की जिच्या किमतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ते म्हणजे लिंबू. लिंबाच्या वाढत्या किंमतीने (rising prices) सर्वांनाच हैराण केले आहे. 20-30 रुपयांना मिळणारा एक किलो लिंबू आता 200-300 रुपयांना मिळत आहे. लिंबाच्या किमती पाहता उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून एक अतिशय रंजक प्रकार समोर आले आहे. वाराणसीतील एका दुकानदाराने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये मोबाईल अॅक्सेसरीज खरेदीवर मोफत लिंबू (Free lemon) दिले जात आहे.
वाराणसीच्या लहुराबीरमध्ये मोबाइल शॉप चालवणारे यश जयस्वाल मोबाइल अॅक्सेसरीजच्या खरेदीवर ग्राहकांना मोफत लिंबू देत आहेत. यशच्या मते, ग्राहकांना लिंबाची ऑफर खूप आवडली आहे, जोपर्यंत लिंबाच्या किमती सामान्य होत नाहीत तोपर्यंत ही ऑफर सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यशने सांगितले की ते 50 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मोबाईल ऍक्सेसरीजच्या खरेदीवर 2-4 लिंबू मोफत देत आहेत.
मोबाईलचे दुकान चालवणाऱ्या यश जयस्वाल यांनी सांगितले की, महागाईमुळे मार्केट गायब आहे, त्यामुळे विक्री वाढवण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागते, म्हणून त्यांनी ग्राहकांना मोफत लिंबू देण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की ग्राहकांना ही ऑफर खूप आवडली आहे आणि या ऑफरमुळे त्यांच्या दुकानातील ग्राहकांची संख्याही वाढत आहे.
मोबाईल खरेदीवर एक लिटर पेट्रोलची ऑफरही हिट ठरत आहे. यश जयस्वाल यांच्या दुकानात लिंबूच नाही तर, मोफत पेट्रोलची ऑफरही जोरात सुरू आहे. यशने सांगितले की, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मोबाईल फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला एक लिटर पेट्रोल मोफत दिले जात आहे.
वाराणसीमध्ये पेट्रोलची किंमत 106.07 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय शहरात एक लिटर डिझेलचा दर ९७.६३ रुपये इतका आहे. ग्राहकांना या दोन्ही ऑफर आवडत असल्याने, दुकानातील गर्दी वाढत असल्याचे त्यांनी सांगीतले.
संबंधित बातम्या
Palak Tiwari : ‘हिला वडापाव खाण्याची गरज आहे….’ म्हणत पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल