नवी दिल्ली : भारतीय आयकर विभागाने पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक (Aadhaar Pan Link )करणे बंधनकारक केले आहे. आता त्याची अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली आहे. या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत. पण ज्यांना अत्यंत उशीरा जाग आली, त्यांना आता एका अडचणीचा सामना करावा लागत आहे. या अडचणीमुळे दोन्ही कार्ड लिंक करणे अवघड झाले आहे. आयकर विभागाने या समस्येवर एक उपाय सांगितला आहे. ही अडचण दूर झाली तरी अनेकांना दोन्ही कार्ड जोडता येतील. नाहीतर मुदत संपल्यानंतर त्यांना दंड भरुन जोडणी करावी लागणार आहे.
1 जुलैपासून इतका दंड
इनकम टॅक्स अॅक्ट 1961 अंतर्गत पॅन कार्ड, आधार कार्डशी जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. 30 जून 2023 रोजीपर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. जोडणी न झाल्यास पॅन कार्ड बंद होईल. या दोन्ही कार्डची जोडणी होण्यासाठी अनेकदा मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता ती वाढविण्यात येणे अशक्य आहे. ही मुदत संपल्यानंतर जोडणी करणाऱ्यांना 1 जुलैनंतर 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
हे होईल नुकसान
या कारणामुळे अडचण
अनेक जण अंतिम मुदतपूर्वी हे दोन्ही कार्ड जोडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या एका चुकीमुळे त्यांचे दोन्ही कार्ड जोडण्यास अडचण येत आहे. आधार कार्डवरील, नाव, जन्मतारीख, लिंग अशी डेमोग्राफिक माहिती आणि पॅन कार्डवरील माहिती मिसमॅच होत आहे. ती जुळत नसल्याने दोन्ही कार्ड जोडण्यात अडचण येत आहे. पण या दोन्ही कार्डवरील ही माहिती एकसारखी केल्यास ही अडचण दूर होऊ शकते.
मग कसं करता येईल लिंक
जर तुम्ही यापूर्वीच दोन्ही कार्डमधील नावातील चूक, जन्मतारीख आणि इतर चूका दुरस्त केल्या असतील तर तुमचे दोन्ही कार्ड लिंक करता येईल. तरीही अडचण येत असेल तर त्यावर प्राप्तिकर खात्याने एक उपाय सांगितला आहे. तुम्ही पॅन सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या केंद्रात ही अडचण दूर करु शकता. शुल्क भरुन बायोमॅट्रिक बेस्ट ऑथेंटिकेशन सुविधा मिळवू शकता.