नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : पॅन आणि आधार कार्ड लिंक (PAN-Aadhaar Card Linking) करण्याची अंतिम मुदत संपली आहे. ही जोडणी न केल्याने अनेकांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले आहेत. दंड भरुन त्यांना पॅनकार्ड आणि आधार कार्डची जोडणी करता येईल. पण तोपर्यंत अशा करदात्यांना पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. आधार कार्डशी जोडणी न केल्याने अनेक करदात्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहेत. पण या करदात्यांना आयकर खात्याने आयटीआर भरण्यास विशेष सवलत दिली आहे. त्यांना काही शुल्क आकारुन आयटीआर (ITR) भरता येईल. कारण काय, कोणते आहेत हे करदाते..
परदेशी भारतीयांना विशेष सवलत
भारतीय आयकर विभागाने याविषयीचा खुलासा केला आहे. त्यानुसार, परदेशी भारतीयांसाठी नियमात शिथिलता आणण्यात आली आहे. प्रवाशी भारतीयांना (NRI) पॅन कार्ड निष्क्रिय झाले असले तरी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता येईल.
ट्विटर हँडलवरुन दिली माहिती
आयकर विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंबंधीची माहिती दिली. प्राप्तिकर विभागाने ट्विट केले आहे. विभागाने प्रवासी भारतीयांना आणि परदेशी नागरिकांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले म्हणून चिंता व्यक्त केली आहे. त्यांची माहिती अपडेट न केल्याने त्यांना हा फटका बसल्याचे विभागाने म्हटले आहे. तसेच काही प्रवाशी भारतीयांनी तीन मूल्यांकन वर्षातील आयटीआर फाईल न केल्याचा फटका बसल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे.
Dear Taxpayers,
Concerns have been raised by certain NRIs/ OCIs regarding their PANs becoming inoperative, although they are exempted from linking their PAN with Aadhaar.
Further, PAN holders, whose PANs have been rendered inoperative due to non-linking of PAN with Aadhaar,…— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 18, 2023
NRI यांना करावे लागेल हे काम
एनआरआय व्यक्तींनी त्यांची माहिती अपडेट करावी. त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करावीत, असे आयकर विभागाने स्पष्ट केले. यासंबंधीच्या अधिकाऱ्याकडे (JAO) ही माहिती द्यावी. यामध्ये प्रामुख्याने त्यांचे निवासी पत्ता अपडेट करावा, असे आवाहन विभागाने केले आहे. तसेच ज्यांनी यापूर्वीच हे काम केले आहे. त्यांना आधार-पॅन कार्डशी जोडणे आवश्यक नसल्याचे विभागाने स्पष्ट केले.
मुदतवाढीची मागणी
देशात सध्या आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कर व्यावसायिकांची सर्वात जुनी आणि मोठ संस्था सेल्स टॅक्स बार असोसिएशनने याविषयी मागणी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना या संस्थेने पत्र लिहिले आहे. सध्या देशाची राजधानी दिल्लीत पूर आलेला आहे. त्यामुळे आयकर खात्यासह इतर अनेक कार्यालयांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. अनेक करदाते या शेवटच्या टप्प्यात कर भरतात. अनेक ठिकाणी वीज खंडीत झाली आहे. इंटरनेट कोलमडले आहे. त्याचा फटका करदात्यांना बसला आहे. त्यामुळे आयकर भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.