Spices Price | महागाईच (Inflation) आता सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग झाली आहे. आता जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली नाहीतर जीवनात आळणीपणा आली की काय, असं वाटतं नाही का? प्रत्येक वस्तू महाग झाली आहे. गेल्या दोन वर्षांत महागाईने कळसच काय आकाशाला ठेंगणं केलं आहे. इंधन दरवाढ (Petrol-Diesel), वीज दरवाढ, गॅस, किराणा, किरकोळ सामान, दूध, मीठ सगळ्याच क्षेत्रात जोरदार किंमती वाढल्या आहेत. खाद्यतेल अजूनही महागच आहे. तर आता ज्यामुळे भाज्यांना चव येते, सुहास दरवळतो, तो मसाला ही महाग झाला आहे. मसाल्याच्या किंमती (Spices Price) वाढल्याने त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना (Common Man) आता बसणार आहे. ऐन सणासुदीत मसाल्याच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे फुरका मारून पिणारी आमटी असो वा खास भाज्या यांची चव जास्तकाळ जीभेवर काही रुळणार नाही.
गेल्या काही वर्षांत मसाल्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर दरवाढीचा स्पीड तुमच्या लक्षात येईल. या वेगाने तर कोणचे उत्पन्नसुद्धा वाढत नाही. गेल्या दोन वर्षांत मसाल्याच्या पदार्थांवर नजर टाकली. त्यांच्या किंमतीवर नजर टाकली तर किंमतीतील वाढ लक्षात येईल. गेल्या दोन वर्षांत मसाल्याच्या किंमतीत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. एवढेच नाहीतर खाद्यतेलाच्या किंमती अगोदरच खूप वाढल्यानंतर आता त्यात थोडीफार घट झाली आहे. तर डाळींचे भाव ही वाढले आहे. तांदुळाच्या किंमतीत 32 टक्के वाढ झाली आहे.
हिंग लावून न विचारणे हा वाक्प्रचार आपल्याला माहिती आहे. पण किंमती इतक्या वाढल्या आहेत की, किराणा दुकानावर जाणार गरीब हिंगालाच, हिंग लावून विचारत नसल्याची वेळ आली आहे. हिंगाकडे ढुंकूनही कोणी पाहत नाही. कारम किंमतीच तशा वाढल्या आहेत. अफगाणिस्तानसह इराण आणि इतर देशातून भारतात हिंगाची आयात करण्यात येते. पुरवठा विस्कळीत झाल्याने हिंगाच्या किंमतीत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. गरम मसाल्याची किंमतीत 155.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.
पदार्थ | वाढ(टक्क्यांत) |
---|---|
मिरची पावडर | 12.20 |
हळद | 11.60 |
गरम मसाला | 15.60 |
जिरे | 12.70 |
हिंग | 12.20 |
पूर्वी भरल्या खिशांनी जाणारा सर्वसामान्य नागरिक अर्धा खिसा आणि पूर्ण भरलेल्या पिशवीने परत यायचा. आता भरल्या खिशांनी बाजारात जाणारा व्यक्ती, पूर्ण खिसा खाली करुन अर्ध्या पिशवीसह परत येतो, ही वस्तूस्थिती आहे. सर्वच क्षेत्रात महागाईने अधिक्रमण केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीला आला आहे.