मुंबई : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने आपल्या अमृत कलश स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीमला ( Amrit Kalash FD Scheme ) मुदत वाढ दिली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या फिक्स्ड डिपॉझिट ( एफडी ) योजनेची मुदत आधी 31 मार्च 2023 पर्यंत होती. आता स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने आपल्या ( Amrit Kalash FD Scheme ) या लोकप्रिय योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.
एफडीत मिळतंय 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज
स्टेट बॅंक ऑफ इंडीयाची अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट स्कीम 400 दिवसांची होती. एसबीआयच्या ( SBI ) या चारशे दिवसांच्या योजनेत सामान्य ग्राहकांना 7.10 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरीकांना 7.60 टक्के व्याज मिळत आहे. सिनियर सिटीजन्सला सामान्य ग्राहकांपेक्षा 50 बेसिस पॉईंट ( 0.50 टक्के ) अधिक व्याज मिळत आहे. स्टाफ आणि स्टाफ पेंशनरना सुद्धा अतिरिक्त व्याज मिळत आहे.
प्रिमॅच्युअर विड्रॉवलची खास सुविधा
स्टेट बॅंके ऑफ इंडीयाच्या अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट स्कीम ब्रांच / आयएनबी / YONO चॅनलसाठी उपलब्ध आहे. एसबीआयची ही स्पेशल स्कीम प्रिम्यच्युर विड्रॉवलसह उपलब्ध आहे. आणि डिपॉझिटवर लोन घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. टर्म डिपॉझिट्ससाठी इंटरेस्टचे पेमेंट मासिक, त्रैमासिक, आणि अर्ध वार्षिक केले जाते असे स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने म्हटले आहे. स्पेशल टर्म डीपॉझिटवर ते मॅच्युरीटीवर होईल असे बॅंक ऑफ इंडीयाने म्हटले आहे.