पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार? पहा अर्थमंत्री कराड काय म्हणतात

| Updated on: Feb 12, 2022 | 8:33 PM

केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी निवडणुकीनंतरच्या भाववाढीच्या मुद्द्याला बगल देत बिगर-भाजप शासित राज्यांवर निशाणा साधला आहे. भाजप शासित मध्यप्रदेशपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (MAHARASHTRA PETROL RATE) अधिक असल्याचे मंत्री कराड यांनी म्हटले आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार? पहा अर्थमंत्री कराड काय म्हणतात
पेट्रोल
Follow us on

नवी दिल्ली : सध्या उत्तरप्रदेश सहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (ASSEMBLY ELECTION) प्रचार शिगेला पोहोचला आहे. शंभरीपार पोहचलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन मतदारांची नाराजी टाळण्यासाठी केंद्रानं अद्याप दरवाढ केलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी निवडणुकीनंतरच्या भाववाढीच्या मुद्द्याला बगल देत बिगर-भाजप शासित राज्यांवर निशाणा साधला आहे. भाजप शासित मध्यप्रदेश पेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (MAHARASHTRA PETROL RATE) अधिक असल्याचे मंत्री कराड यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या आवाहानंतर भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेल वरील कर कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीला बिगर-भाजप शासित (NON-BJP STATE) राज्यं गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोपही कराड यांनी केला आहे.

केंद्राचं कर कपातीचं आवाहन:

केंद्र सरकारने गेल्या वर्षी दिवाळीमध्ये पेट्रोल-डिझेलवरील केंद्रीय करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांची कपात केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM NARENDRA MODI) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्राप्रमाणं राज्याचा कर कपातीचे आवाहन केलं होतं.

‘क्रिप्टो’चं भविष्य काय?

केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीवर केवळ टॅक्सच लावला आहे. अद्याप सरकारकडून अधिकृत कायदेशीर चलनाचा दर्जा बहाल करण्यात आलेला नाही. सरकारने केवळ क्रिप्टोच्या कमाईला कर कक्षेत आणले आहे. क्रिप्टो व्यवहारांना अधिकृत करणं किंवा बंदी घालणं याबद्दल अंतिम निर्णय झाला नसून वरिष्ठ स्तरावर क्रिप्टोच्या अधिकृततेबाबत चर्चा सुरु असल्याचं कराड यांनी म्हटलं आहे.

30 टक्के कर

केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीला (Cryptocurrency) कर कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या वित्तीय वर्षात क्रिप्टोकरन्सी पासून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे क्रिप्टोवर कर आकारणी विषयी असलेल्या शंकांवर यापूर्वीचं केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) स्पष्टीकरण दिलं आहे. एप्रिल 2022पूर्वी करण्यात येणारे क्रिप्टो व्यवहार करमुक्त नसणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2022) अर्थ मंत्र्यांनी डिजिटल संपत्तीतून होणाऱ्या कमाईवर 30 टक्के कर आकारणीची घोषणा केली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सी आणि नॉन फंजीबल टोकन (NFT) यांचा मुख्यत्वे समावेश आहे. क्रिप्टो खरेदी-विक्रीतून मिळविलेले पैसे बँकात ट्रान्सफर केल्यास 30 टक्के कर आकारणी केली जाईल.

संबंधित बातम्या

संरक्षण क्षेत्रात ‘स्वदेशी’चा नारा या स्टॉकमधील गुंतवणूक वाढवेल तुमचा जोश

Video: भाजपविरोधात कुणी बोलत नाही, असं वातावरण का आहे? अमित शहांना Rahul Bajaj यांनी कडक शब्दात विचारलं तेव्हा…

Rahul Bajaj Passes Away : प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास