शेअर मार्केटसाठी (Stock market) आजचा दिवस चांगला राहिला आहे. शेअर मार्केट सुरू होताच सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. शेअर मार्केटच्या पहिल्याच सत्रामध्ये सेंसेक्सने 350 अकांची उसळी घेतली. दर निफ्टीमध्ये देखील 100 अकांची वाढ झाली. आज शेअर मार्केट सुरू होताच सेंसेक्स (BSE Sensex) 350 अकांच्या वाढीसह 58,910.74 अकांवर पोहोचला. मंगळवारी शेअर बाजार 58,576.37 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे आज निफ्टी (NSE Nifty) देखील 100 अकांच्या वाढीसह 17,649 अंकांवर पोहोचला. मंगळवारी निफ्टी 17,530.30 अंकांवर बंद झाला होता. आज सेंसेक्समध्ये आलेल्या तेजीचा सर्वाधिक फायदा हा टाटा स्टीलला झाला. टाटा स्टीलचे शेअर्स टॉप गेनवर राहिले. तर दुसरीकडे डॉक्टर रेड्डीजच्या शेअरचा समावेश टॉप लूजर मध्ये झाला. त्यामुळे डॉक्टर रेड्डीजच्या शेअरला मोठा फटका बसला आहे. ओएनजीसीच्या शेअर्समध्ये 2.49 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आज शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. शेअर मार्केट ओपन होताच सेंसेक्सने 350 अंकांची उसळी घेतली. 350 अकांच्या वाढीसह सेंसेक्स 58,910.74 अकांवर पोहोचला. दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील वाढ झाल्यचे पहायला मिळाले. निफ्टी 100 अकांच्या वाढीसह 17,649 अंकांवर पोहोचला. आज टाटा स्टीलचे शेअर्स टॉप गेनवर राहिले. शेअर मार्केटमध्ये तेजी आल्याने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. मात्र दुसरीकडे डॉक्टर रेड्डीजच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने शेअर्स पडले आहेत. गुंतवणूकदारांना देखील फटका बसला आहे.
काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. कधी सेंसेक्स आणि निफ्टी अचानक उसळी घेतात, तर कधी मोठ्या प्रमाणात घसरण होते. शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या या चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील सभ्रमाचे वातावरण आहे. शेअर मार्केटमध्ये चढ -उतार दिसून येण्याचे अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसात हे आशियाई शेअर बाजारावर पडताना दिसून येत आहेत. सोबतच जागतिक स्थरावर घडणाऱ्या घडामोडींचा देखील मोठा फटका हा शेअर बाजाराला बसला आहे.
महागाईचा कहर! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, FMCG वस्तूंच्या खरेदीत घसरण
LIC IPO या महिन्याच्या शेवटी गाठणार मुहूर्त; 12 मेपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता
पुण्यानंतर आता मुंबईकरांनाही CNG दरवाढीचा फटका; सीएनजीमध्ये पाच तर पीएनजीमध्ये साडेचार रुपयांची वाढ