कमीत कमी वेळेत अधिकाधिक पैसे कमवण्याचे स्वप्न पहाणाऱ्या लोकांसाठी शेअर बाजार (Stock Market) हे एक मोठे आकर्षण असते, शेअर बाजारात एखादा व्यक्ती जर मोठ्या प्रमाणात नफा मिळवत असेल तर तुम्हालाही त्याच्याकडे बघून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची, त्याच्या माध्यमातून नफा (Return) मिळवण्याची इच्छा होते. मात्र अनेकदा शेअर बाजाराची पूर्ण माहिती नसणे, किंवा जवळ गुंतवणूकसाठी पैसे नसणे या गोष्टी अडचणीच्या ठरतात. जवळ पैसा नसल्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहाते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की तुम्हाला जर शेअर मार्केटमधून कमाई करायची असेल तर त्यासाठी पैसे (Money) गुंतवण्याची गरज नाही, तुम्ही पैसे न गुंतवताही शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता, एवढेच नाही तर तुम्ही पैसे कमवण्यासोबतच शेअर मार्केटमधील ज्ञान देखील मिळू शकता. आज आपण अशाच दोन मार्गांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे न गुंतवता देखील पैसे कमवता येऊ शकतात.
हा पर्याय अशा व्यक्तींसाठी उपयुक्त आहे, ज्यांना शेअर बाजारामधील थोडी-फार माहिती आहे. तुम्ही या पर्याचा उपयोग करून, विविध ब्रोक्रिंग फर्मला त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करू शकता. या बदल्यात तुम्हाला कॅश आणि विविध ऑफर मिळतात. हा एक प्रकारचा साईड बिझनेस आहे. तुम्ही या माध्यमातून वेगवेगळ्या ब्रोक्रिंग फर्म्सला त्यांच्या डिमॅट खात्यांचा विस्तार वाढवण्यासाठी मदत करू शकता. वेगवेगळ्या संस्था अशा लोकांना वेगवेगळ्या ऑफर्स देतात. उदा: कोटक सिक्योरिटीज अशा पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक खात्यामागे पाचशे रुपये देते. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिनाऱ्या लोकांना खाते ओपन करण्यासाठी मदत करून दर महिन्याला चांगली कमाई करू शकता.
या प्रकारामध्ये ज्यांना आर्थिक क्षेत्रामधील चांगली माहिती आहे, ज्यांना शेअर मार्केटचे चांगले ज्ञान आहे, असे लोक कमाई करू शकता. यामध्ये तुम्ही एखाद्या ब्रोकिंग फर्म्स सोबत मिळून काम करू शकता. तुम्ही संबंधित ब्रोकिंग फर्म्सच्या क्लाइंट्सला ट्रेडिंग सुविधा देऊन, किंवा कंपनीच्या इतर आर्थिक प्रोडक्ट्सची विक्री वाढवून त्या माध्यमातून तुम्ही पैसे कमऊ शकता.
Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ