Stock market investment : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? चुकीच्या सल्लागारांपासून सावधान, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

| Updated on: Aug 21, 2022 | 2:20 AM

देशात शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. 2019 ते 2022 मध्ये प्रतिमहिना डिमॅट खाते उघडण्याची संख्या 6 पट वाढली आहे. मात्र याचबरोबर गुंवणुकीबाबत चुकीचे सल्ले देणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

Stock market investment : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? चुकीच्या सल्लागारांपासून सावधान, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
पश्चिम महाराष्ट्रात कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा आरोप
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

साहिलच्या मित्राने स्टॉक मार्केटमध्ये (stock market) गुंतवणूक करून चांगली कमाई केली. मित्राला पाहून साहिल देखील शेअर्समध्ये (Stock) गुंतवणूक (investment) करण्यासाठी प्रयत्न करत होता. यावेळी तो सोशल मीडियावरील टेलिग्राम ग्रुपशी जोडला गेला. या ग्रुपमध्ये पाच हजाराहून अधिक लोक सामील होते. या ग्रुपवर काही स्टॉकचे स्क्रीनशॉट्स शेअर केले जात होते. या शेअर्समध्ये मागील एक ते दोन वर्षात 300 ते 400 टक्क्यापर्यंत परतावा मिळालेला दिसून येत होता. हे पाहून साहिलने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. साहिलला सुरुवातीला चांगला परतावा मिळत होता. त्यामुळे त्याने गुंतवणूक वाढवली. टेलिग्राम अॅडमिनच्या सल्ल्यानुसार त्याने आतापर्यंत सुमारे 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. परंतु शेअर्समध्ये होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे त्याच्या जवळपास 70 टक्के रक्कमेचे नुकसान झाले. तरीदेखील ‘इंतजार का फल मीठा है’ असे म्हणत सल्लागार त्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडत आहे.

सेबीकडून कारवाई

साहिलच्या पोर्टफोलियोमध्ये सर्व पेनी स्टॉक आहेत. सोशल मिडियावर न मागता सल्ला देऊन मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते.पेनी स्टॉकच्या शेअर्सची किंमत 10 रुपयांहून कमी असते. सहसा यामध्ये चढ-उतार अधिक असतात. the Globle statistics. com च्या अहवालानुसार भारतात 53 कोटी व्हॉट्सअप आणि 37 कोटी टेलिग्राम यूजर्स आहेत. या प्लॅटफॉर्मवर अनेकजण सल्लागाराच्या रुपात लोकांना सल्ले देतात आणि विशिष्ट शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी सांगतात. सुरुवातीला हे लोक फ्रीमध्ये टिप्स देतात आणि नंतर फी घेण्यास सुरुवात करतात. काही जण प्रॉफिटचा 40 टक्के एवढा हिस्सा ठरवतात. परंतु नुकसान झाल्यानंतर काढता पाय घेतात.यामध्ये अधिक सल्लागार हे पैसे लुटण्याच्या उद्देशाने येतात.यांच्याविरोधात बाजार नियामक सेबी कारवाई करत आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणुकीच्या प्रमाणात मोठी वाढ

देशात शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. 2019 ते 2022 मध्ये प्रतिमहिना डिमॅट खाते उघडण्याची संख्या 6 पट वाढली आहे. जून 2022 पर्यंत देशात 9.65 कोटी डिमॅट खाती सुरू करण्यात आली आहेत. परंतु यादरम्यान फ्रॉडचे प्रमाणदेखील वाढल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत हा आकडा 10 पट जास्त आहे. नियमानुसार शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला केवळ सेबी प्रमाणित विश्लेषक देऊ शकतात. याविषयी 2016 मध्ये सेबीने आदेश जारी केले आहेत. परंतु सोशल मिडियावर अनेक लोक या नियमाचे उल्लंघन करताना दिसतात. मात्र यामध्ये सर्वाधिक नुकसान हे गुंतवणूकदारांचे होते. त्यामुळे जर शेअर मार्केटमधून कमाई करायची असेल तर संपूर्ण अभ्यास करून,ते समजून घेऊन चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. फसवणुकीपासून वाचण्यासाठी अधिकृत सल्लागाराकडून मदत घ्यावी. पेनी स्टॉकमध्ये जोखीम असल्याने गुंतवणूक सांभाळून करावी.