शेअर बाजारात (Stock market) भरपूर रिटर्न (Returns) मिळत असल्यानं पुण्याच्या नेहानं शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करण्यास सुरुवात केली. गेल्या एका वर्षांपासून ती बाजारात थोडी-थोडी गुंतवणूक करत आहे. पण स्पॉट आणि फ्युचर्स मार्केटमधील फरक तिला अद्याप समजला नाही. तिच्या मित्रांनाही स्पॉट आणि फ्युचर्स मार्केटची माहिती नाही तरीही ते तिला फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करण्याचा सल्ला देत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या बहुतांश लोकांची हीच स्थिती आहे. फ्युचर्स आणि स्पॉट मार्केट यांच्यात काही संबंध आहे की नाही ? याबद्दल बरेच लोक गोंधळलेले आहेत. आज आपण फ्युचर्स मार्केट म्हणजे काय? स्पॉट मार्केट म्हणजे काय या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे का? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर तु्म्ही भविष्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.
स्पॉट आणि फ्युचर्स मार्केटचा एकमेकांशी संबंध आहे. फ्युचर्स मार्केटमधील अस्थिरता किंवा बदल स्पॉट मार्केटमध्येही दिसून येतील. त्याचप्रमाणे स्पॉट मार्केटमधील हालचालींचाही फ्युचर्स मार्केटवर परिणाम होतो. आता ट्रेडर्स स्पॉट आणि फ्युचर्स मार्केटमधून कसा नफा कमावतात हे पाहूयात. समजा, फ्युचर्स मार्केटमध्ये एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 240 रु. आणि स्पॉट मार्केटमध्ये 230 रु. आहे. अशावेळी ट्रेडर्स ऑर्बिट्राजद्वारे फायदा कमावतात. फ्युचर्स आणि स्पॉट मार्केटमधील किंमतीमधील फरकाला आर्बिट्राज असे म्हणतात. ट्रेडर्स फ्युचर्स करार शॉर्ट करतात म्हणजेच कराराची विक्री करतात आणि स्पॉट बाजारात त्याच कंपनीचे शेअर्स खरेदी करतात. या उदाहरणाप्रमाणे ट्रेडर्सला प्रति 10 रु. शेअर्सचा फायदा होतो.
दोन्ही बाजारातील किंमतीमधील फरकातून फायदा घेण्यात येतो. मात्र, याचा परिणाम फ्युचर्स आणि स्पॉट या दोन्ही मार्केटवर पडतो. दोन्ही बाजारातील किंमतीमुळे मागणी आणि पुरवठ्यावर दबाव येतो. ज्यावेळी ट्रेडर्स फ्युचर्स मार्केटमध्ये शॉर्ट म्हणजेच शेअर्सची विक्री करतात त्यावेळी स्पॉट मार्केटमध्ये किंमती पडतात. विक्रीसाठी करारांची संख्या वाढल्यानं स्पॉट मार्केटमध्ये किंमती खाली येतात. तर दुसरीकडे स्पॉट मार्केटमध्ये खरेदीचा दबाव वाढल्यानं किंमती वाढतात. ऑर्बिटार्जमुळे दोन्ही बाजारातील शेअर्सच्या किंमती जवळपास एकसमान होतात. आता याच्या उलट परिस्थिती पाहूयात म्हणजे स्पॉट बाजारात शॉर्ट म्हणजे शेअर्सची विक्री करण्यात येते तर फ्युचर्स बाजारात लॉक शेअर्सची खरेदी करण्यात येते. फ्युचर्स ट्रेडिंगमुळे शेअर्सच्या किंमतीत तीव्र चढ-उतार कमी होतात. जर तुम्हाला आर्बिट्रेजद्वारे पैसे कमवायचे असतील तर या दोन्ही मार्केटमधील लॉट साइज देखील पहावी लागते.