नवी दिल्ली : सरकारी लघू बचत योजनांमध्ये (SMALL SAVING SCHEME) सुकन्या समृद्धी योजना अग्रक्रमावर आहे. तुमच्या घरात किंवा कौटुंबिक परिघात दहा वर्षाहून कमी वयाची मुलगी असल्यास तिच्या नावे निश्चितपणे अकाउंट उघडू शकतात. केंद्र सरकारने महत्वाकांक्षी सुकन्या समृद्धी योजनेच्या (SUKANYA SAMRUDDHI YOJANA) संबंधित पाच महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे योजनेत गुंतवणूक आणि अन्य प्रक्रिया अत्यंत सुलभ बनली आहे. नेमके सुकन्या समृद्धीत कोणते बदल करण्यात आले आहेत जाणून घेणे महत्वाचे ठरतात. सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत अर्जदार मुलीच्या नावे कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) खाते उघडू शकतो. या योजनेअंतर्गत किमान 250 रकमेसह खाते उघडले जाऊ शकते. तर योजनेत कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करण्याची मर्यादा आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत प्रति वर्ष किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करण्याची तरतूद आहे. यापूर्वीच्या तरतुदीनुसार किमान रक्कम जमा न केल्यामुळे अकाउंट डिफॉल्ट होण्याच्या घटना घडत होत्या. मात्र, सुधारित बदलानुसार अकाउंट पुन्हा अॅक्टिव्ह न केल्यासही मॅच्युर होईपर्यंत खात्यात जमा रकमेवर लागू असलेल्या दरानुसार व्याज प्राप्त होईल.
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत कलम 80-सी अंतर्गत कर सवलतीची तरतूद होती. तिसऱ्या मुलीसाठी अशाप्रकारचा लाभ उपलब्ध नव्हता.मात्र, आता एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली झाल्यास दोन्हींसाठी खाते उघडण्याची निश्चितपणे तरतूद असेल आणि त्यावर कर सवलत देखील उपलब्ध होईल.
पहिल्या नियमानुसार खातेधारक मुलीचं वय 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खात्याचे संचलन करण्याचे अधिकार दिले जात होते. मात्र, नव्या नियमानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातून व्यवहार करण्याचे अधिकार मुलीला प्राप्त होतील. कालावधीपर्यंत खात्याची नामनिर्देशित व्यक्ती खात्याचे व्यवहार संचलित करेल.
सुकन्या समृद्धी योजना खातेधारकाचा मृत्यू झाल्यास अकाउंट बंद करण्याची तरतूद पूर्वी होती. मात्र, आता खातेधारकाचा एखाद्या दुर्धर आजारामुळं मृत्यू झाल्यास अकाउंट बंद केले जाऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात वित्तीय वर्ष संपण्यापूर्वीच खात्यात व्याज जमा होईल. या योजनेअंतर्गतच्या खात्यावरील गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज मिळते.
खाते उघडण्यासाठी योजनेच्या अर्जासोबत मुलीचं जन्माचं प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. या सोबत मुलगी आणि आई-वडीलांचं ओळखपत्र हवं. (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, विज बिल, टेलिफोन बिल, पाण्याचं बिलं)जमा करावे लागेल.
सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत जमा केलेली रक्कम मुलीचं वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्युर होते. म्हणजेच, तुम्ही खातेधारकाच्या वयााची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकतात. त्यासोबतच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढू शकतात.
इतर बातम्या :