नवी दिल्ली : आधार कार्डधारकांसाठी गुडन्यूज आहे. 10 वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांना आता आणखी तीन महिने त्यांचे आधार (Aadhaar Card Update) मोफत अपडेट करता येणार आहे. यापूर्वी 14 जून पर्यंत आधार अपडेट करण्याची मुदत होती. यावर्षी मार्च महिन्यापासून ही सवलत देण्यात आली होती. पण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुदत वाढ दिली आहे. आता नागरिकांना 14 सप्टेंबर, 2023 रोजी पर्यंत आधार कार्ड अपडेट करता येईल. आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झाले असेल तर नागरिकांनी आधारमधील पत्ता आणि डेमोग्राफिक (Demographic) तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. ही पद्धत अत्यंत सोपी आहे.
महत्वाच्या कामासाठी उपयोग
सध्या आधार हा अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्डची गरज पडते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार अपडेट मोफत करता येते.
myAadhaar पोर्टलवर अपडेट
आधार कार्ड अपडेट myAadhaar पोर्टलवर करता येते. ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डमधील माहिती अद्ययावत करता येईल. या 15 मार्च ते 14 जून 2023 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. 14 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
कितीवेळा कराल अपडेट
आधार कार्डमधील माहिती अपडेट किती वेळा करता येते, असा सर्वांनाच प्रश्न पडतो. त्यासंबंधी काही नियम आहेत. त्यानुसार, नागरिकांच्या नावात दोनदा बदल करता येतो. तर जन्मतारीख आणि लिंगामध्ये एकदाच बदल करता येतो. आधार कार्ड तयार करताना आणि माहिती भरताना काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
असे करा आधार कार्ड अपडेट
कॉपी करा स्कॅन