नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांचे शिक्के पाहिले असतील. आता तुम्हाला 100 रुपयांचा (Rs 100 Coin) शिक्का मिळेल. केंद्र सरकार लवकरच 100 रुपयांचा शिक्का बाजारात घेऊन येत नाही. त्यासाठीची तारीख ही निश्चित करण्यात येत आहे. हा शिक्का इतर नाण्यांपेक्षा वेगळा ठसा उमटवेल. केंद्र सरकारने (Central Government) यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, केंद्रीय प्राधिकरणांतर्गत जारी करण्यात येणाऱ्या टांकसाळींमध्ये केवळ शंभर रुपयांची नाणी पाडण्यात येतील, तयार करण्यात येतील. केंद्र सरकार 100 रुपयांचे नाणे कधी जारी करणार, ते कसे दिसेल, त्यात काय खास आहे, असे अनेक प्रश्न आहेत, त्याविषयी जाणून घ्या.
कसा दिसेल 100 रुपयांचा शिक्का
अधिसूचनेनुसार, 100 रुपयांच्या शिक्क्याचा गोलाकार 44 मिलीमीटर आहे. यामध्ये चांदी, तांबे, निकेल आणि जस्त एकत्र असतील. नाण्याच्या मागील बाजूस अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या 100 रुपयांच्या नाण्यावर मायक्रोफोन बनवला जाईल आणि त्यावर 2023 लिहिले जाईल. नाण्याच्या एका बाजूला भारत लिहिलेले असेल आणि दुसऱ्या बाजूला INDIA लिहिलेले असेल आणि वरच्या शीर्षकाखाली ₹ हे चिन्ह अंकीत असेल.
या दिवशी बाजारात येईल शिक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमादरम्यान या नवीन शंभर रुपयांच्या नाण्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचा लवकरच 100 वा भाग पूर्ण होत आहे. या निमित्ताने 100 रुपयांचा शिक्का जारी करण्यात येणार आहे. या शिक्क्यावर ‘मन की बात 100’ (Mann Ki Baat) असे लिहिलेले असेल. 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात 100’ कार्यक्रम होत आहे. त्यासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्ष एक लाखपेक्षा अधिक बुथवरुन या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करणार आहे.
असा असेल शिक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरील ‘मन की बात’ हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी, दसऱ्याला सुरु झाला होता. शंभर रुपयांचं हे नाणं 44 मिलीमीटर आहे. यामध्ये चांदी, तांबे, निकेल आणि जस्त एकत्र असतील. नाण्याच्या मागील बाजूस अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या 100 रुपयांच्या नाण्यावर मायक्रोफोन बनवला जाईल आणि त्यावर 2023 लिहिले जाईल. नाण्याच्या एका बाजूला भारत लिहिलेले असेल आणि दुसऱ्या बाजूला INDIA लिहिलेले असेल आणि वरच्या शीर्षकाखाली ₹ हे चिन्ह अंकीत असेल.