नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिकिंग करणे अनिवार्य केले आहे. करदात्यांना त्यांच्या परमनन्ट अकाऊंट नंबरवरुन (Pan Card) आधार लिंक करण्याचा यापूर्वीच सूचना देण्यात आली होती. हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची डेडलाईन, अंतिम मुदत 31 मार्च 2023 ही आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर , पॅन कार्ड रद्द होईल. त्याचा काहीच उपयोग करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही बँकिंग, म्युच्युअल फंड, शेअर बाजाराशी संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. बीएसई, एनएसई तुम्हाला व्यवहार करु देणार नाही. म्हणजे तुमच्या आर्थिक व्यवहारांना थेट निर्बंध येतील.
ज्या करदात्यांनी आतापर्यंत त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक केलेले नाही, त्यांना सध्या 1000 रुपयांचे शुल्क आकारुन दोन्ही कार्ड लिंक करता येतील. दंड न आकारता ही डेडलाईन 30 जून 2022 ही होती. जर तुम्ही पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर आता 31 मार्च 2023 या अंतिम मुदतीपूर्वी ही जोडणी करुन घ्या.
तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.