Marathi News Utility news The income per month in this scheme of government, so much investment has to be done
Post Office Scheme : योजना सरकारी, बक्कळ कमाई महिनेवारी
Post Office Scheme : शेअर बाजारातूनच बक्कळ कमाई होते असे नाही, पोस्टाच्या या योजनेत गुंतवणुकीच्या हमीसह चांगला परतावा मिळतो.
Follow us on
नवी दिल्ली : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर अनेक योजना बाजारात आहेत. पोस्ट कार्यालयाच्या(Post Office Investment Scheme) अनेक योजनेत गुंतवणुकीवर हमी तर मिळतेच पण जोरदार परतावा पण मिळतो. केंद्र सरकार अनेक बचत योजना चालविते. यामध्ये सार्वजनिक भविष्य निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरीक बचत योजना आणि किसान विकास पत्र या योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. विशेष म्हणजे केंद्र सरकार (Central Government) या बचत, गुंतवणूक योजनांची हमी घेते. म्हणजे तुमचा पैसा बुडत नाही.
महिन्याला फायदा
केंद्र सरकारद्वारे चालविली जाणारी बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना एक निश्चित मासिक उत्पन्न मिळते. ही योजना पोस्टाद्वारे चालविल्या जाते. राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना देशभरातील सर्व टपाल खात्यात उपलब्ध आहे. ही टपाल खात्याची सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेला POMIS असे नाव आहे. या बचत योजनेत कुठलीच जोखीम नाही. योजनेत निश्चित व्याजदर मिळते. गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला कमाईचे साधन उपलब्ध होते.
या योजनेचे वैशिष्ट्ये
हे सुद्धा वाचा
टपाल खात्याच्या मासिक उत्पन्न योजनेत कमीतकमी 1000 रुपये आणि त्याच्या पटीत गुंतवणूक करता येते
एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकता
एकल, संयुक्त खात्यातंर्गत गुंतवणुकीच्या मर्यादेनुसार एखाद्या व्यक्तीला दोन्ही खात्यात गुंतवणूक करता येते