Income Tax App : करदात्यांसाठी जबरी सुविधा! आयकर खात्याने आणले ॲप, असा होईल लाभ

| Updated on: Mar 23, 2023 | 10:46 AM

Income Tax App : करदात्यांसाठी आयकर खात्याने आणखी एक सुविधा दिली आहे. त्यांच्यासाठी विभागाने नवीन ॲप सुरु केले आहे. यामाध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा मिळतील. त्यांचा काय फायदा होईल, ते पाहुयात..

Income Tax App : करदात्यांसाठी जबरी सुविधा! आयकर खात्याने आणले ॲप, असा होईल लाभ
Follow us on

नवी दिल्ली : आयकर विभाग (Income Tax Department) करदात्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारीत अनेक सोयी-सुविधा देतात. आयकर विभागाने आता दोन वेबसाईट सुरु केल्या आहेत. त्यामाध्यमातून करदात्यांना (Tax Payers) कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. तांत्रिक दोष दूर करुन देशभरातील करदात्यांना वेळेत आणि जलदररित्या कर जमा करता यावा, यासाठी आयकर खाते सातत्याने प्रयत्न करत आहे. प्राप्तिकर सादर करण्यासाठी यापूर्वीच्या किचकट आणि कठीण अर्जाला फाटा देण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्यात येत आहे. आता आयकर विभागाने करदात्यांसाठी मोबाईल ॲप (Mobile App) सुरु केले आहे. यामाध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा मिळतील. त्यांचा काय फायदा होईल, ते पाहुयात..

काय मिळतील सुविधा

आयकर विभागाने करदात्यांसाठी मोबाईल ॲप सुरु केले आहे. ॲपच्या माध्यमातून करदात्यांना टीडीएससंबंधीची माहिती मिळेल. वार्षिक सूचना विवरण (AIS) मोबाईलवर पाहता येईल. विभागाने बुधवारी करदात्यांना ॲपचा काय फायदा होईल याची माहिती दिली. उत्पन्नाच्या स्त्रोतवर कपात, कर संग्रह (टीडीएस/टीसीएस), व्याज, लाभांश आणि शेअरविषयीची माहिती घेता येईल. करदात्यांना त्यांचे मतही मांडता येईल. त्यांना सूचना करता येतील. करदात्याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून वार्षिक सूचना विवरण , करदात्यांसाठीच्या सूचना उपलब्ध होतील.

हे सुद्धा वाचा

करदात्यांना मोबाईल ॲप गुगल प्ले आणि ॲप स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDC) ने या मोबाईल ॲप विषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, या माध्यमातून, नोटिफिकेशनमधून करदात्यांना आयकर विभागाच्या सूचना प्राप्त होतील. ते अपडेट राहतील. त्यांना कर पात्र उत्पन्न आणि इतर माहिती सहज मिळेल.
टीडीएस/टीसीएस, व्याज, लाभांश, आयकर रिफंड, इतर गोष्टींची माहिती मिळेल.

करदात्यांना डिसेंबरनंतर पुन्हा एकदा अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न (Updated ITR Filing) भरण्याची संधी मिळाली आहे. आयकर विभागाने याविषयीचे ट्विट करत माहिती दिली आहे. त्यानुसार, ज्या करदात्यांना 31 डिसेंबर, 2022 ही सुधारीत आयकर रिर्टन (Updated ITR Filing) दाखल करण्याची तारीख हुकली. त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) साठी ज्यांना आयकर रिटर्न भरण्यासाठी विलंब झाला. त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. केंद्र सरकारने ही संधी दिली आहे. अर्थसंकल्प 2022 मधील आयटीआर यू (ITR-U) भरण्याची संधी ज्यांनी गमावली, त्यांना ही सवलत मिळत आहे.

हे ठेवा लक्षात

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (विलंबित, सुधारित किंवा अपडेट केलेले) भरल्यानंतर, 30 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचा पडताळा केला नाही. ते सत्यापित केले नाही. तर आयकर विभाग ते पुढील प्रक्रियेसाठी घेणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचे नसल्याचे गृहीत धरण्यात येईल.