नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी उद्यापर्यंतचा वेळ दिला आहे. फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जूनपर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतर आधारमध्ये तपशील भरण्यासाठी, आवश्यक बदलासाठी नागरिकांना पूर्वीसारखेच शुल्क अदा करावे लागेल. ज्यांच्या आधार कार्डला 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि त्यांनी यादरम्यान कधीच आधार कार्ड अपडेट केले नाही, त्यांच्यासाठी आधार कार्ड मोफत अद्ययावत करण्याची एकच दिवसांची संधी उरली आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तर आधार केंद्रावर (Aadhaar Centre) जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.
या कालावधीत मोफत सेवा
आधार प्राधिकरणाने नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत सेवा दिली होती. दस्तावेज ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्यासाठी ही सुविधा मोफत सुरु करण्यात आली होती. 15 मार्च ते 14 जून 2023 रोजीपर्यंत ही सेवा मोफत होती. उद्या, 14 जून रोजी मोफत सेवा समाप्त होत आहे. त्यामुळे तुम्ही अजून आधार कार्ड अपडेट केले नसेल तर अद्ययावत करुन घ्या.
इतके शुल्क द्यावे लागेल
आधार प्राधिकरणाने ऑनलाईन कागदपत्रे अपडेट करण्यासाठी मोफत सेवा 14 जून 2023 पर्यंत देण्यात आली होती. या मुदतीनंतर आधार केंद्र अथवा ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे.
ही घ्या काळजी
आधारचा पत्ता असा करा मोफत अपडेट