Chinese Loan Scam | फसव्या कर्ज योजनांपासून रहा चार हात लांब, चीनी ॲप्स लावतील चूना

| Updated on: Oct 21, 2023 | 6:21 PM

Chinese Loan Scam | त्वरीत कर्ज देणाऱ्या चीनी ॲप्समुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले. चीनमधील काही सायबर भामटे हे ॲप्स चालवत आहेत. हे सायबर गुन्हेगार ग्राहकांना झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर ग्राहकांकडून ॲप्स सुरु ठेवण्याची परवानगी मिळवून फोनमधील माहिती चोरतात. त्याचा मोठा फटका बसतो.

Chinese Loan Scam | फसव्या कर्ज योजनांपासून रहा चार हात लांब, चीनी ॲप्स लावतील चूना
Follow us on

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : चीनी ॲप्सच्या फसवेगिरीने भारतामधील अनेक राज्यातील आयुष्य उद्धवस्त झाले आहे. दक्षिणेतील राज्यात काही कुटुंबांच्या आत्महत्येमागे कर्ज वसूलीसाठीची पिळवणूक समोर आली आहे. काही चीनी ॲप्सने केंद्र सरकारच्या कडक पावलामुळे आता त्यांचे धोरण बदलवले आहे. ते ग्राहकांना त्वरीत कर्ज देण्याचे आमिष दाखवत आहे. एकदा सावज जाळ्यात ओढले की, त्याची मोबाईलमधील माहिती चोरण्यात येते. त्याआधारे त्याची फसवणूक करण्यात येते. सध्या अशा अनेक ॲप्सचे जाळे ऑनलाईन विणण्यात आले आहे. CloudSEK च्या रिपोर्टनुसार, हे फसवणूक करणारे ॲप्स बेकायदेशीररित्या काम करत आहेत. ते सर्वसामान्यांना, गरजूंना कर्जाचे आमिष दाखवत आहेत.कर्ज देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करण्याचा उद्योग या चीनी भामट्यांनी सुरु केला आहे.

अनेक देशात पसरले जाळे

या सायबर भामट्यांनी एकट्या भारतालाच लक्ष्य केले असे नाही तर अनेक देशांत त्यांचे जाळे पसरले आहे. त्यामाध्यमातून ते गरजूंना जाळ्यात ओढतात आणि त्यांची फसवणूक करतात. एका रिपोर्टनुसार, 55 हून जास्त अँड्रॉईड ॲप्सच्या मार्फत ही फसवणूक करण्यात येत आहे. रिसर्चनुसार, हा घोटाळा करणारे 15 हून अधिक पेमेंट गेटवे हे चीनमधून काम पाहत आहेत. चीनमधील सायबर गुन्हेगार या पेमेंट गेटवेचा वापर करत नागरिकांना चूना लावत आहेत. त्यांचे जाळे इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, मॅक्सिको, तुर्की, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि कोलंबिया यादेशात पसरले आहे.

हे सुद्धा वाचा

अशी करतात फसवणूक


ज्यांना तात्काळ एक छोटी रक्कम हवी असते, ते या सायबर भामट्यांचे सर्वात सोपं सावज असते. म्हणजे 5 ते 25 हजार रुपयांपर्यंचे कर्ज हवे असणाऱ्यांना नागरिकांना ते लक्ष करतात. असा ग्राहक टप्प्यात आल्यावर त्याला स्वस्त कर्जाचे आमिष दाखविण्यात येते. त्याच्याकडून ॲप्स चालविण्यासाठीची परवानगी घेण्यात येते. त्यानंतर युझर्सची खासगी माहिती चोरण्यात येते. त्याचे फोटो, त्याचे कॉन्टक्ट्स, इतर माहिती चोरण्यात येते. त्याआधारे युझर्सला ब्लॅकमेल करण्यात येते. बदनामी करण्याची धमकी देत पैसे उकळण्यात येतात. तर काही जण बँकेचा तपशील चोरुन फसवणूक करतात.