Pan Card : पॅन कार्ड हरवलं, घरबसल्या असे तयार करा डुप्लिकेट कार्ड

| Updated on: May 20, 2023 | 7:36 PM

Pan Card : पॅन कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे. ते अचानक हरवलं तर मोठी अडचण येऊ शकते, त्यामुळे या सोप्या पद्धतीने डुप्लिकेट पॅन कार्ड मिळविता येईल.

Pan Card : पॅन कार्ड हरवलं, घरबसल्या असे तयार करा डुप्लिकेट कार्ड
Follow us on

नवी दिल्ली : पॅनकार्ड (Pan Card) असा महत्वाचा दस्तावेज आहे की, त्याविना तुमची कामे थांबू शकतात. अनेक ठिकाणी पॅनकार्डची फोटोकॉपी (Photocopy) जोडणे आवश्यक आहे. पॅनकार्डवर तुमचा कायमस्वरुपी विशिष्ट क्रमांक असतो. मोठी रक्कम अथवा व्यवहार करताना तुम्हाला पॅनकार्डची गरज पडते. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी तुम्हाला पॅनकार्डची गरज पडते. पॅनकार्डवर अल्फान्यूमेरिक क्रमांक (Alphanumeric) असतो. हा आयकर खात्याकडून देण्यात येतो. अनेक व्यवहार यामुळे सुकर होतात. जर तुमचे पॅनकार्ड हरवले, गायब झाले तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही घरबसल्या डुप्लिकेट पॅनकार्ड तयार करु शकता.

घरबसल्या करा अर्ज
पॅनकार्ड हरवल्यास तुम्हाला घरबसल्या त्यासाठी अर्ज (PAN Card Apply) करता येईल. त्यानंतर पॅनकार्ड मिळेल. पॅन कार्ड पुन्हा प्राप्त करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जसोबतच तुम्हाला तपशील द्यावा लागतो. त्यासाठी 110 रुपयांचे शुल्क अदा करावे लागेल. नंतर घरपोच पॅन कार्ड मिळेल.

आर्थिक गैरव्यवहाराची भीती
पॅन कार्ड हरवले तर सर्वात अगोदर पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दिल्यास फायद्यात रहाल. पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहाराशी संबंधित महत्वपूर्ण कागदपत्र आहे. त्याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या पॅनकार्ड आधारे फ्रॉड झाल्यास ही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पॅन कार्ड हरवल्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करा.

हे सुद्धा वाचा

असा करा अर्ज

  1. सर्वात अगोदर NSDL च्या https://www.protean-tinpan.com/ ला भेट द्या
  2. रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड हा पर्याय निवडा
  3. हा पर्याय त्याच लोकांसाठी आहे, ज्यांच्याकडे पूर्वीचे पॅनकार्ड आहे
  4. रिप्रिंट पॅनकार्ड पर्यायावर क्लिक केल्यावर एक फॉर्म समोर येईल
  5. या फॉर्ममध्ये जो तपशील मागितला आहे, तो भरा
  6. फॉर्म जमा करताना कुठल्याही बॉक्समध्ये राईट क्लिक करायची नाही
  7. फॉर्म जमा झाल्यावर एक Acknowledgment Receipt मिळेल
  8. भारतीय नागरिकांसाठी हे शुल्क 110 रुपये तर परदेशातील नागरिकांसाठी हे शुल्क 1011 रुपये आहे.
  9. पावतीची प्रिंट काढून त्यावर फोटो लावा आणि स्वाक्षरी करा
  10. ई-केवायसी वा ई-साईनद्वारे माहिती भरता येईल.
  11. त्यानंतर ही माहिती सत्यापित करावी लागेल.
  12. माहिती सत्यापित करण्यासाठी अर्जदाराला मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, इयत्ता 10 वीचे बोर्ड प्रमाणपत्र यांच्या सत्यप्रती NSDL च्या पुणे येथील कार्यालयात पाठवाव्या लागतील.
  13. पुढील 15 दिवसांत तुमचे डुप्लिकेट पॅनकार्ड घरपोच मिळेल.

ऑनलाईन अर्ज असा करा

  1. www.tin-nsdl.com या संकेतस्थळावर जा
  2. होमपेजवर Reprint of Pan Card हा पर्याय निवडा
  3. आता एक स्वतंत्र पेज उघडेल. त्यावर अर्जदाराला त्याचे नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक ही माहिती भरा
  4. त्यानंतर टोकन क्रमांक जनरेट होईल. हा अर्जदाराच्या ई-मेलवर येईल
  5. त्यानंतर अर्जदाराला त्याची वैयक्तिक सविस्तर माहिती द्यावी लागले
  6. त्यानंतर ई-पॅन वा फिजिकल पॅन यापैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल
  7. त्यानंतर तुमचा पत्ता भरा आणि शुल्क अदा करा
  8. त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात फिजिकल पॅनकार्ड मिळेल
  9. ई-पॅनकार्ड अवघ्या 10 मिनिटात प्राप्त होईल. पॅनकार्डची डिजिटल कॉपी सेव्ह करता येईल