Gold Silver Price Today News | सोन्याचे दर स्थिर, चांदी घसरली, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर?

| Updated on: Aug 21, 2022 | 1:31 PM

Gold Silver Price Today News | कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव रविवारी 47,800 रुपये होता.

Gold Silver Price Today News | सोन्याचे दर स्थिर, चांदी घसरली, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर?
आजचे सोन्या-चांदीचे दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Gold Silver Price Today News | आज रविवारी सोन्याचे दर स्थिर आहेत. तर चांदीच्या भावात किंचित घट झाली आहे. गेल्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याच्या दरात(Gold Rate Today) यापूर्वी 840 रुपयांची वाढ झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (American Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची शक्यता लक्षात घेत आणि डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. मंदीच्या आशंकेने ही सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच गुंतवणूकदारांनीही सोन्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,800 रुपये होता, तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा शुक्रवारचा भाव हा 52,090 रुपये होता, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,150 रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीचा भाव रविवारी 55,600 रुपये किलो होता. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.

 

चांदीत आठवडाभरात मोठी घसरण

चांदीत आठवडाभरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीचा दर गेल्या सोमवारी 59,300 रुपये प्रति किलो होता. तर गेल्या रविवारी हाच भाव 58,500 रुपये प्रति किलो रुपये (Silver Price Today) होता. 21 ऑगस्ट 22 रोजी, रविवारी चांदीचा दर 55,600 रुपये प्रति किलो आहे. या आठवड्यात चांदीत किलोमागे 3,700 रुपयांची घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,800 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,150 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,830 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,180 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,800 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,180 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,800 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,180 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 556 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.