Brand Story: कहाणी आत्मनिर्भर भारताची, Mivi ने कसं मिळवलं यश?

| Updated on: Jun 04, 2023 | 6:39 AM

भारतीय उद्योगपती जगात वेगळेपण कायम ठेवतात. युवक आत्मनिर्भर भारताची नवी शक्ती बनत आहेत. अमेरिका, युरोपमधून शिकून येतात. भारतीय बाजारात युवा पिढी यशाची शिखरं गाठत आहे.

Brand Story: कहाणी आत्मनिर्भर भारताची, Mivi ने कसं मिळवलं यश?
Follow us on

हैदराबाद : सध्या काही कंपन्या आत्मनिर्भर भारताच्या कहाण्या लिहत आहेत. त्यापैकी एक आहे मिवी (Mivi). ही भारताची एक कंपनी आहे जी इलेक्ट्रीक अॅक्सेसरीज आणि लाईफ स्टाईल उत्पादनांचा व्यवसाय करते. कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. सात वर्षात कंपनीने मोठी झेप घेतली आहे. मिवीचे ब्रँड संपूर्ण देशात स्वदेशी आहे. केबल, चार्जर, टेम्पर्ड ग्लास, कस्टम, डिझायनर फेस, पावर कार, कार एक्सेसरीज, हेडफोन, वायरलेस ईअरफोन, स्पीकर आदी इलेक्ट्रीक गॅझेट विक्री करतात.

भारतीय उद्योगपती जगात वेगळेपण कायम ठेवतात. युवक आत्मनिर्भर भारताची नवी शक्ती बनत आहेत. अमेरिका, युरोपमधून शिकून येतात. भारतीय बाजारात युवा पिढी यशाची शिखरं गाठत आहे.

केव्हा आणि कशी झाली मिवीची स्थापना?

हे ब्रँड २०१५ ला सुरू झाले. विजयवाडा येथील युवकांनी सुरू केलं. त्यांची नाव आहेत विश्वनाथ आणि मिधुला. दोघांची भेट भारतात नाही, तर फ्लोरीडा स्टेट युनिव्हर्सिटीत झाली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

फ्लोरीडा स्टेट युनिव्हर्सिटीचे स्नातक झाल्यानंतर त्यांनी काही काल अमेरिकेत काम केलं. विश्वनाथ ज्या कंपनीत काम करत होते ती कंपनी भारतात इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती करत होती. मिधुला सॉफ्टवेअर इंजिनीअर होती.

दोघेही २०१५ मध्ये भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी मिवी लाँच केलं. या ब्रँडचा उद्देश भारतात नवीन ब्रँड तयार करणे होता. सामान्य व्यक्तीसाठी नवनवीन उत्पादान तयार करणे होता.

कशी आणि कुठून मिळाली प्रेरणा?

भारतात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, भारतात इलेक्ट्रिक वस्तू खूप महाग आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रँड महाग आहेत. अशावेळी भारतीय बाजारात जागा बनवणे सोपे नव्हते. दोघांनीही चांगल्या क्वॉलिटीचे इलेक्ट्रिक ब्रँड तयार करणे सुरू केले.

या रणनीतीने मिळाला फायदा

मिवीची मार्केटिंग वेगळी होती. मिवीने २०१८ मध्ये भुवन बामला आपला ब्रँड एम्बासिडर बनवले. मिवीचा टार्गेट १७ ते ३५ वयोगटातील लोकं होते. मिवीचे सुमारे ६० टक्के ग्राहक शहरातील आहेत.

कोट्यवधी डॉलरची कंपनी आहे मिवी

पहिल्या वर्षी मिवीने आठ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मिवी प्लॅटफार्मची ७० टक्के विक्री अॅमेझॉन, फ्लीपकार्ड, पेटीएम आदी ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरून होते. २०२१ मध्ये व्यवसायात मोठी उडी मारली. दर महिन्याला अडीच ते तीन कोटी रुपये नफा कमावला. २०२४ मध्ये ब्रँड २५ बिलीयन डॉलरचा करायचा विचार आहे.