या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, आता मिळणार अधिक पेन्शन; दिवाळीपूर्वीच सरकारने दिले गिफ्ट

| Updated on: Oct 24, 2024 | 4:02 PM

Additional Pension : केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांना अतिरिक्त पेन्शन देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने (DoPPW) नुकतीच याविषयीची सूचना दिली. जन्म तारीख त्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. काय आहे बातमी?

या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, आता मिळणार अधिक पेन्शन; दिवाळीपूर्वीच सरकारने दिले गिफ्ट
अतिरिक्त पेन्शन मिळणार
Follow us on

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना या दिवाळीत मोठं गिफ्ट मिळालं आहे. त्यांच्यासाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. केंद्र सरकारने 80 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुकंपा भत्ता रुपाने अतिरिक्त पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने (DoPPW) नुकतीच याविषयीची सूचना दिली. जन्म तारीख त्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. या ताज्या अपडेटमुळे सरकारकडून मिळणाऱ्या अतिरिक्त लाभांची स्थिती पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. वयाचा 80 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचार्‍याला अतिरिक्त पेन्शनची लॉटरी लागणार आहे.

कशी आहे निवृत्तीची गणना?

80 व्या वर्षी, वाढदिवस साजरा करणाऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शन लागू होईल. म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा जन्म 20 ऑगस्ट, 1942 रोजी झाला असेल तर त्याला पेन्शनची अतिरिक्त रक्कम 1 ऑगस्ट, 2022 रोजीपासून मिळेल. त्यासाठी तो पात्र असेल. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने (DoPPW) नुकतीच याविषयीची सूचना दिली आहे.

हे सुद्धा वाचा

किती वाढेल पेन्शनची रक्कम?

80 वर्षाच्या निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे मूळ पेन्शन वा अनुकंपा भत्त्यात या योजनेनुसार 20 टक्के अतिरिक्त रक्कम मिळेल. अतिरिक्त रक्कमेची टक्केवारी वयानुसार वाढणार आहे. 85 ते 90 वर्षादरम्यान पेन्शनची रक्कम 30 टक्क्यांपर्यंत तर 90 ते 95 वर्षादरम्यान ही रक्कम 40 टक्क्यांपर्यंत वाढेल. तर 100 वर्ष आणि त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनाच्या 100 टक्के पेन्शन मिळेल. आता ही योजना 70 व्या वर्षापासून लागू करण्याची मागणी पण जोर धरत आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही.

विभागाने काढले परिपत्रक

निवृत्ती वेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने याविषयीची माहिती दिली आहे. विभागाने त्यासाठी परिपत्रक काढले आहे. त्याआधारे पेन्शनची स्थिती, तारीख आणि त्याचे गणित समजावून सांगण्यात आले आहे. सर्व संबंधित विभाग, बँकांना या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पेन्शनर्ससाठी प्रक्रिया सुटसुटीत करण्यावर भर देण्यात येत आहे.  या नवीन धोरणामुळे 80 वर्षाच्या निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे मूळ पेन्शन वा अनुकंपा भत्त्यात या योजनेनुसार 20 टक्के अतिरिक्त रक्कम मिळेल.