मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : घरासाठी किंवा कारसाठी काढाव्या लागत असलेल्या कर्जापेक्षा पर्सनल लोनचे व्याजाचा दर जादा असतो. त्यामुळे पर्सनल लोन काढताना सर्व बॅंकाच्या पर्सनल लोनची माहीती काढून त्यानूसार आपले व्याज वाचविले पाहीजे. तसेच ज्यांच्या क्रेडीट स्कोर चांगला असतो त्यांना देखील बॅंक कर्ज देताना कमी व्याज दर लावत असतात. तर पाहूया कोणत्या बॅंका पर्सनल लोनसाठी किती व्याज दर आकारतात ते….
जेव्हा तुमच्याकडे खर्चासाठी पैशाची कमतरता असते अशावेळी छोट्या मोठ्या खर्चासाठी पर्सनल लोन काढावे लागते. परंतू इतर कर्जापेक्षा या पर्सनल लोन जादा व्याजदर लावले जाते. त्यामुळे बॅंकेची निवड करताना थोडा विचार करुन माहीती काढायला हवी आहे. विविध बॅंका पर्सनल लोनसाठी वेगवेगळे व्याजदर आकारीत असतात. तर पाहूयात विविध बॅंकांचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर पाहूयात.
20 लाख रुपयापर्यंतच्या पर्सनल लोनसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र 84 महिन्यांच्या अवधीसाठी 10.00 टक्के वार्षिक व्याज दर आकारते.
3 लाख रुपयांपर्यंतच्या पर्सलन लोनसाठी पंजाब एण्ड सिंध बॅंक 10.15 टक्के ते 12.80 वार्षिक व्याजदर आकारत असते.
20 लाख रुपयांच्या कर्जाऊ रक्कम आणि 84 महिन्यांच्या अवधीसाठी बॅंक ऑफ इंडीया 10.25 टक्के वार्षिक व्याजदर आकारते.
30,000 रुपयांहून अधिक किंवा त्याएवढ्या 25 लाख रुपयांच्या पर्सनल लोनसाठी इंडसइंड बॅंक 12 महिन्यापासून ते 60 महिन्यांच्या अवधीसाठी 10.25 टक्के ते 32.02 चे व्याज दर आकारते.
50, 000 रुपयांपासून 20 लाखापर्यंतची कर्जाऊ रक्कमेसाठी बॅंक ऑफ बडोदा ( BoB) 10.35 टक्के ते 17.50 टक्के वार्षिक व्याजदर आकारले जाते. त्याचा कार्यकाळ ते 48 ते 60 महिन्यांचा असणार आहे.