नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : वाढत्या महागाईत जर आपले म्हातारपण सुखात घालवायचं आहे, तर आजकाल बॅंकांत एफडीवर चांगलं व्याज मिळत आहे. अनेक बॅंकांमध्ये एफडीवर चांगले व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर एफडीवर सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेचस चांगले व्याज दिले जाते. आज आपण पाच अशा बॅंका पाहणार आहोत ज्या पाच वर्षांच्या एफडीवर सिनियर सिटीझनला चांगले व्याज देत आहेत.
एफडीवर गुंतवणूक करणे नेहमीच चांगली फायदेशीर ठरत आहे. आता अनेक बॅंका सिनियर सिटीजनसाठी फिक्स्ड डीपॉझिट इंटरेस्टमध्ये वाढ करीत आहेत. त्यात Indusind Bank, Axis Bank सह अनेक बॅंकांचा समावेश आहे. खालील बॅंका फिस्क्ड डीपॉझिट्सवर जादा व्याज देत आहेत.
1 ) DCB BANK – डीसीबी बॅंक पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट ( FD ) वर 8 टक्के व्याज देत आहेत. हे व्याजदर केवळ सिनियर सिटीझनना देत आहेत.
2 ) Indusind Bank – इंडसइंड बॅंक देखील आपल्या सिनियर सिटीझन ग्राहकांना पाच वर्षांच्या फिक्स्ड डीपॉझिट ( FD ) वर 8 टक्के व्याज देत आहे.
3) Axis Bank – एक्सिस बॅंक देखील सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत सिनियर सिटीझन्सना पाच वर्षांच्या फिक्स्ड डीपॉझिट योजनेवर 7.75 टक्के व्याज देत आहे.
4) Yes Bank – यस बॅंक देखील आता 5 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिट (FD) वर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.
5 ) IDFC First Bank – आयडीएफसी फर्स्ट बॅंकने देखील आपल्या ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.
टॅक्स सेव्हींग एफडी योजनेवर कोणताही कर भरावा लागत नाही. परंतु, आपण गुंतवलेल्या पैशांवर वर्षभरात जर 40 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाला तर मात्र कर भरावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत, ही सूट मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत आहे. मॅच्युरिटी झाल्यावर, बँक TDS कापल्यानंतर शिल्लक रक्कम भरते.