नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) या सरकारी कंपन्यांनी (Government Companies) गुंतवणूकदारांना जोरदार लाभांश (Dividend) वाटप केले आहे. हा लाभांश मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा जास्त असल्याचा बाजारातील तज्ज्ञांचा दावा आहे. एफडी (FD) पेक्षा जास्त लाभांश देणाऱ्या या सरकारी कंपन्या तरी कोणत्या आणि त्यांनी किती रुपयांचा लाभांश जाहीर केला हे पाहुयात..
सरकारी कंपनी आरईसी लिमिटेडने (REC Limited) आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रत्येक शेअरमागे 5 रुपयांचा लाभांश घोषीत केला आहे. REC चा शेअर आज 96.50 रुपयांवर बंद झाला.
या आर्थिक वर्षात REC कंपनीने आतापर्यंत 13.30 रुपयांचा लाभांश दिला आहे. मुदत ठेवीपेक्षा ही रक्कम कितीतरी अधिक आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या शेअरधारकाला मोठा फायदा झाला आहे.
सरकारी मेटल कंपनी सेलने (SAIL) आर्थिक वर्ष 2022 मध्ये प्रत्येक शेअर मागे 8.75 रुपयांचा लाभांश घोषीत केला आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL) या आर्थिक वर्षात तीनवेळा लाभांश दिला आहे.
कंपनीचा शेअर सध्या 82 रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीने यापूर्वी 4 रुपये, मार्च 2022 मध्ये 2.50 रुपये आणि 2.35 रुपये लाभांश दिला आहे. म्हणजे जवळपास 10.70 रुपयांचा लाभांश दिला आहे.
पावर फायनान्स कॉर्पोरेशनचा (PFC) शेअर सध्या 52 आठवड्यांच्या निच्चांकीस्तरावर आहे. हा शेअर 22 टक्के घसरुन 142.30 रुपयांवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये प्रत्येक शेअर मागे 12.25 रुपयांचा लाभांश दिला आहे.
या शेअरने 2.50 रुपये, 2.50 रुपये आणि 6 रुपये असा लाभांश दिला आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात 1.25 रुपये लाभांश दिला आहे. PFC शेअर सध्या 110 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरने आतापर्यंत 11 टक्क्यांहून अधिकचा लाभ दिला आहे.
कोल इंडिया लिमिटेडने (CIL) या आर्थिक वर्षात FY22, शेअर होल्डर्सला एकूण 17 रुपयांचा लाभांश दिला आहे. डिसेंबर 2021 आणि फेब्रुवारी 2022 मध्ये अनुक्रमे 9 रुपये आणि 5 रुपयांचा लाभांश दिला आहे. तर ऑगस्टमध्ये 3 रुपयांचा लाभांश दिला आहे.
कोल इंडिया लिमिटेडचा शेअर सध्या 240 रुपयांच्या जवळपास आहे. या कंपनीचा वार्षिक लाभांश सरासरी 7 टक्के आहे. कंपनीने मुदत ठेवीपेक्षाही जास्त लाभांश दिला आहे.